संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या आणि हजारो वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्येक हिंदूंच्या मनात असलेले स्वप्न आज साकार होत आहे.गेल्या पाचशे वर्षाच्या मागील इतिहासाकडे नुसती नजर जरी फिरवली,तरी मनामध्ये चीड संताप दुःख दाटून येतं आपल्या असाहाय्यतेची अगतिकतेची लाज वाटायला लागते.हे सगळं आपल्याला सहन करावे लागले,ते केवळ एकाच गोष्टीमुळे.अहो ज्या राष्ट्राला असंख्य पराक्रमी वीरांची,योध्यांची श्रेष्ठ अशा ऋषीमुनींची परंपरा होती,ज्या राष्ट्रात सोन्याचा धूर नियत होता,अशा ज्ञान,विज्ञान,संस्कृती याकरता जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य असणारे आम्ही,कधी यमुनांचे तर कधी इंग्रजांचे गुलाम झालो आणि मग परकीयांनी आपली श्रद्धास्थाने भ्रष्ट करायला सुरुवात केली. आमच्यातील काही मूठभर लोक त्यांना सामील झाले.सोमनाथ, काशी विश्वनाथ,मथुरा,अयोध्या अशा हजारो श्रद्धास्थानांचा विध्वंस केला गेला.त्या जागांवर मशिदी उभारल्या गेल्या. त्यातीलच एक म्हणजे,अयोध्या येथील श्री राम जन्मभूमीवरील मंदिर बाबराच्या आज्ञेने त्याचा सेनापती मिर बाकीने भव्य असे मंदिर पाडून,तिथे बाबरी मशीद नावाचा ढाचा उभा केला. तेव्हापासून आपल्या श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरा करता संघर्ष सुरू झाला.अगणित वेळेला त्याकरता झालेल्या संघर्षात हजारों साधू संत यांनी आपलं बलिदान दिलं.पण दुर्दैवाने त्यात यश मिळू शकली नाही.१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर वाटलं होतं,आता तरी आमची श्रीराम जन्मभूमी मुक्त होईल.पण काँग्रेसने व त्यांच्या डाव्या पिल्लावळीने मुस्लिम तृष्टिीकरणाकरीता कायम हिंदूवर अन्यायच केला. पूर्वीपासून चालू असलेला संघर्ष एकीकडे चालूच होता. सामंजस्याने प्रश्न सोडवणे, न्यायालयीन लढा देणे सुरूच होते.या सगळ्याला एक नवीन दिशा मिळाली.७ एप्रिल १९८४ ला रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना झाली. देशभरातील सर्व साधुसंत व विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला पुन्हा सुरुवात झाली.संपूर्ण देशभर या आंदोलनाने जोर पकडला.त्यात पुढे झालेली ९० ची कारसेवा मुलायमच्या राजवटीत लाखो राम भक्तांवर केलेला अत्याचार गोळीबार ते ९२ च्या कारसेवेच्या वेळेस दस्त बाबरी ढाचा जमीन दोस्त होण्यापर्यंतचा घटनाक्रम त्यानंतर सुरू झाला.तो न्यायालयीन हा पण वर्षानुवर्ष तारीख पे तारीख शेवटी इलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये जन्मभूमीची जमीन तिया पक्षकारात समान टप करण्याचा निर्णय दिला.पण कोणालाच तो राज्य होणारा नसल्याने,शेवटी सर्वोच्च श्रायालयात आव्हान देण्यात आले.२०१९ मध्ये हौस दिवसाच्या सलग सुनावणीनंतर सर्वोच्च वायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला.१९४९ सुरू झालेल्या न्यायालयीन लढ्याचा ७० वर्षांनी शेवट १८८५ मध्ये न्यायालयात केलेली मागणी १३४ दी मान्य झाली.संपूर्ण परिसर हा रामजन्मभूमीला मिळाला इतक्या वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. इतिहासातील इतक्या प्रदीर्घ डाळ चाललेल्या लढ्याचा शेवट सुखद झाला. निमित्ताने निद्रिस्त हिंदू समाजाला आपल्यातील कीची,एकीची ताकद किती आहे ते समजले.दोन ऑगस्ट २०२० या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी भाई मोदी व पूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते श्रीराम मंदिर निर्माणाचा शिलान्यास झाला. आणि अतिशय भव्य दिव्य अशा मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली.एकूण १७.७ एकर जागेवर वा भव्य मंदिराचे निर्माण होत आहे.केंद्र सरकारने गठीत केलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट द्वारा या ऐतिहासिक मंदिराचे काम अत्यंत जलद गतीने सुरू आहे.सोमनाथ मंदिरापासून अनेक मंदिरे बांधण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले वास्तुविशारद सी.बी.सोमपुरा यांनी केलेला हा भव्य मंदिराचा आराखडा असून बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध अशा लार्सन अँड टुब्रो कंपनीकडे मंदिर उभारण्याची जबाबदारी आहे.त्यांना टाटा इन्सल्टन्सी इंजिनियर्स सहाय्य करत आहे.पारंपारिक नागरशैलीमध्ये तयार होणारे हे मंदिर १०८ मीटर ७५ मीटर व उंची ४९ मीटर आहे. मंदिर बन्सी बहारपूर येथील पिंक सैंड स्टोन मध्ये असून मकराना येथील मार्बल वापरणारच आहे.संपूर्ण मंदिराच्या बांधकामात कुठेही स्टीलचा अथवा सिमेंटचा वापर केलेला नाही.कमीत कमी १००० वर्ष काहीही होणार नाही,इतके मजबूत बांधकाम होत आहे. देशभरातील यशस्वी अशा बांधकाम सल्लागार संस्था व आय आय टी च्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनानुसार वाचा पाया तयार केले गेलेला आहे.जवळपास १७ हजार पेक्षा जास्त ब्रॅनाईटचे ब्लॉग याच्या पायाकरता वापरले आहेत. मंदिराला एकूण ३९२ खांब असून प्रत्येक खांबावर २५ मूर्तीचे नक्षीकाम अतिशय सुंदररित्या करत आहेत. एकूण ९८०० मूर्ति भोवती असतील तर मंदिरांच्या भिंतीवर दहा हजार पेक्षा जास्त मूर्ती असतील. श्री राम मंदिराला एकूण ४२ दरवाजे हे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सागवान लाकडाचे असतील व त्यावर सोन्यामध्ये नक्षीकाम केलेले असेल. मुख्य राम लला विराजमान होणारे गर्भगृह हे अष्टकोनी असून नक्षीदार मकराना मार्बलने ते सजवलेले असेल. रामललाच्या चल व अचल मूर्ती विराजमान असतील.राम,भरत,लक्ष्मण व शत्रुघ्न यांच्या चल मूर्ती तर पाच फूट उंचीची रामललाची सहा ते सात वर्षे वयाची ही मुख्य मूर्ती असणार आहे. तळमजल्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे. पहिल्या मजल्यावर रामपंचायतन असणार आहे.जानेवारी २०२४ मध्ये रामलला मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन भाविकांना दर्शन घेता येईल.मंदिराला ७९५ फुटांचा परकोटा म्हणजेच परिक्रमा मार्ग असेल परिक्रमा मार्गावर रामकथेच्या मूर्ती व सहा मंदिरे असतील.संपूर्ण मंदिर तयार होण्यास साधारणतः डिसेंबर २०२५ पर्यंतचा वेळ लागेल.आत्ता सध्या तीन हजार कारागीर आणि मूर्तिकार रात्रंदिवस राम मंदिर पूर्ण होण्याकरता काम करत आहेत.येणाऱ्या काळात दररोज साधारणतः एक लाख भाविक दर्शनाकरता येतील.या हिशोबाने त्यांच्याकरता विश्रांतीगृह,स्वच्छतागृह,दर्शन हॉल इत्यादी व्यवस्था ट्रस्टमार्फत होत आहेत. भविष्यात या सगळ्या परिसरामध्ये यज्ञ मंडप,सभागृह, भजन मंडप, संग्रहालय, गोशाळा इत्यादी अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. पर्यावरण या विषयाकडे ट्रस्ट अधिक लक्ष आहे. अत्यंत सुंदर असे लँडस्केप, विभिन्न प्रकारची वृक्ष लागवड, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वेस्टेज रिसायक्लिंगं प्लांट अशा अनेक गोष्टी तिथे उभारणार आहेत. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाच सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या या मंदिराचे निर्माण होत आहे. हे एक नुसते मंदिर नाही, तर राम जन्मभूमीवरील राममंदिर आहे. हिंदू अस्मितेचे प्रतीक आहे. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेला हा विजय आहे. आपल्या जीवनात रामाचे स्थान अढळ आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत तर जन्मापासून मृत्यूपर्यंत रामनामाशिवाय काहीच नसते. देश-विदेशातील सगळ्यांना जोडणारा हा मर्यादा पुरुषोत्तम राजा राम भाषा, जात, पंथ, संप्रदाय कोणतीही असो, पण प्रत्येकाच्या मनात, हृदयात रामच बसतो आहे. असे हे हिंदू अस्मितेचे प्रतीक बघायला प्रत्येक जण उत्सुक आहे. वाट बघतो आहे कधी आपल्याला दर्शन मिळणार अशी अर्थातच प्रत्येकाच्या मनात भावना आहे. या संघर्षात आपलं जीवन अर्पण करणान्या लाखो ज्ञात अज्ञात रामभक्तांच्या बलिदानाचे, १९८४ साली सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करून सगळ्या देशभर राममय वातावरण तयार करणारे श्रद्धेय अशोकजी सिंगल, महत अवैद्यनाथ, परमहंस रामचंद्र दास, मोरोपंत पिंगळे, कोठारी बंधू अशी असंख्य नावे आहेत. त्या सगळ्यांचे स्वप्न साकार करणारा हा क्षण आहे. ‘सौगंध राम की खाते है मंदिर वही बनायेंगे ही घोषणा प्रत्यक्षात येणारी वेळ आहे.आपण भाग्यवान आहोत २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम लल्लाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापणा सोहळा आपल्यासमोर याची देही याची डोळा आपण पाहणार आहोत.आयुष्यात अजून काय हवे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे पुण्य मिळणार आहे.
श्री राम…जयराम… जयजय राम..!
माहिती संकलन
बाळ ढवळे (रामदासी)