दारूचे व्यसन सोडवा… ते हि न सांगता..!

दारूचे व्यसन सोडवा….. ते हि न सांगता..!
  एक सारखं न चुकता दारू दररोज प्यावीशी वाटणे यालाच दारूचे “व्यसन ” लागले हे ओळखावे.
दारूचे दुष्परिणाम –
1) लिव्हर सिर्रोसिस
2) मानसिक आजाराचा धोका वाढतो.
3) अल्कोहोलचा मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो.
4) दारू अति प्यायल्याने जलोदर(पोटात पाणी होते)सारखा जीवघेणा आजार होतो
5) जास्त मद्यपाणामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
6) दारूच्या व्यसनामुळे अल्सर /मूळव्याधीचा त्रास सुरु होतो.
7) दारू सतत प्यायल्याने स्वदुपिंडाला सूज येते.
8) पोटाचे आजार सुरु होतात.
दारू सोडविण्यासाठी पथ्य (काय खावे)
1) सुरुवातीच्या काळात भूक लागेल त्या वेळी फक्त द्राक्षे खाणे कारण द्राक्षांमध्ये अत्यंत शुद्ध स्वरूपात मद्यार्क असतो.
2) सफरचंद -यामुळे दारूची गुंगी उतरते.
3) खजूर-सकाळी व रात्री 5-5खजूर खावेत
4) कारल्याचा रस -यामुळे लिव्हर ची झालेली हानी भरून काढते
5) सेलिरीची (आज्वानाची पाने )-
दारूला प्रतिकारक म्हणून महिनाभर 1ग्लास सेलिरीचा रस व अर्धा ग्लास पाणी एकत्रित करून पिणे.
रस पानाच्या आहारामुळे रोग्याची मद्य पिण्याची सवय हळू हळू कमी होईल.मद्य पिण्याची सवय मोडण्यासाठी अशा उपचार पद्धतीने केलेली सुरुवात,कधीही फायदेशीर ठरते.या आहारानंतर रोग्याला सलाड (काकडी,बिट,गाजर,टोमॅटो) तृणधान्ये, मोड आलेली कडधान्ये,ड्राय फ्रुट्स, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्री, अननस व भाज्यांचे सूप द्यावे.तुळशीचा रस, मनुके,खजूर, गाजराचा रस
अपथ्य (खाऊ नये )-
तंबाखू, गुटखाजन्य पदार्थ, नॉनव्हेज, खारट पदार्थ, ग्रेव्ही, मसालेदार पदार्थ, शेंगा, वाळलेले खोबरे, तिळ,पापड,मैदा, हिरवी मिरची, लोणचे, दही यामुळे दारूकडे मन जास्त ओढले जाते.
उपाय –
1) सुरुवातीला मद्य पिण्याची ईच्छा तीव्र असते त्यामुळे रुग्णाला दारुऐवजी सतत “फळांचा रस “पाजावा.
2) Strong Determination –
दारू सोडण्यासाठी रुग्णाने दृढ निश्चय करणे फार गरजेचे आहे
3) तुमची दिनचर्या बदला –
स्वतःला इतके कामात /व्यवसायात व्यस्थ ठेवा की दारू ची आठवण आली नाही पाहिजे.
4) उत्पनाचे नवनवीन sources डेव्हलप करा, त्याविषयी फोकस करा-
यामुळे भूत काळातील कटू गोष्टी, वैरत्व, शोक, राग हे सर्व तुमच्या डोक्यातून निघून जाईल व तुम्ही उत्तम आयुष्य जगू शकाल
5) promise yourself –
स्वतःला वचन द्या. ज्याप्रमाणे मधुमेह असलेला व्यक्ती, मिठाई बघतो पण खात नाही त्याप्रमाणे दारू पासून लांब राहा.
6) सोसिअल सपोर्ट घ्या –
तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्तीसमोर, मित्रांसमोर मांडा यामुळे तुमच्या मनातील ताण कमी होईल तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा. तुमचे मन गुंतेल ते काम करा.
7) पॉसिटीव्ह ऐका, बोला व बघा –
सतत नकारात्मक गोष्टी ऐकल्याने, बोलल्याने व बघितल्याने मानसिक ताण वाढून माणूस नशेकडे वळतो त्यामुळे पॉसिटीव्ह ऐका, बोला व बघा.
8) मेडिटेशन करा –
यामुळे मन शांत होईल व मनात चाललेले वादळ देखील शांत होईल.सकाळी 15-20 मिनिटे मेडिटेशन केल्याने पूर्ण दिवस उत्साहात जातो.
9) तुमचे छंद जोपासा –
स्वतः साठी काही वेळ काढा व तुमचे आवडते छंद त्या वेळेत पूर्ण करा.
10) Forgive All –
तुमच्या सोबत भूतकाळात वाईट गोष्टी घडल्या असतील तर मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि त्यावेळीच तुमच्या मनातील ईर्ष्या, द्वेष, राग, वैमनस्य निघून जाईल. संपूर्ण जग तुम्हाला सकारात्मक दिसेल.
11) दालचिनी, जिरे, गिलोय,त्रिफळा, ब्राम्ही, शंखपुष्पी यांचे चूर्ण एकत्रितपणे सकाळी व रात्री 2चमचे गरम पाण्यातून प्या.याने तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
12) नियमितपणे सूर्यनमस्कार मंत्रौपचारासहित करावेत.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340
Spread the love
error: Content is protected !!