शिरोळ / प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शिरोळ नंबर १ या शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” अंतर्गत पालक सभा , मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ व बदलती जीवनशैलीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान असा संयुक्त सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. आशा शहापूरे यांनी केले.माऊली ऑर्थोपेडिक अँड डेंटल हॉस्पिटल जयसिंगपूरच्या संचालिका डॉ स्वाती मंगसुळे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
डॉ स्वाती मंगसुळे म्हणाल्या की शरीर हे मंदिर आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आहार, झोप,डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन व सल्ला घेतला पाहिजे.कोणतीही दुखणे अंगावर काढू नये.कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी स्त्रीवर अवलंबून असते.त्यांनी कुटुंबाचे व वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.मधुमेह, हृदयरोग, मानसिक ताण तणाव,दातांचे आजार वाढत आहेत.आपली जीवनशैली नैसर्गिक व आनंददायी राखण्यासाठी योग,प्राणायाम,सात्विक आहार,झोप, पर्यटन या बाबीकडे लक्ष द्यायला हवे.असेही त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांची शारीरिक व दंत आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.कार्यक्रमानंतर महिलांचे हळदी- कुंकू व तिळगुळ वाटप घेण्यात आले.उपस्थित माता पालकांना संक्रांतीचे वाण भेट देण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले, उपाध्यक्षा सुप्रिया गावडे,सदस्य विजय पट्टणशेट्टी,आनंद कुंभार,राजेश संकपाळ,प्रदीप पिसाळ,भगवान कोळी , संजीवनी चुडमुंगे ,श्रद्धा कुन्नुरे, अश्विनी पाटील, मोहिनी कांबळे अध्यापक विमल वर्धन ,भारती इंगळे, तेजस्विनी पाटील ,प्रियांका जगदाळे, अश्विनी चुडमुंगे, बाळासो कोळी, दीपक वावरे यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रमजान पाथरवट यांनी आभार मानले.