पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलना मध्ये भावपूर्ण गीते देशभक्तीपर गीते भारुड, लोकगीते ,समाजप्रबोधनात्मक नाटीका (पृथ्वी वाचवा) , मोबाईलचे होणारे दुष्परिणाम संबंधी प्रबोधन पर नाटिका या विषयावर’ कार्यक्रम सादर झाला.तसेच राष्ट्रसेवा प्रशाला ही गेली 33 वर्ष हि प्रशाला ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत.राष्ट्रीय लेव्हलचे खेळाडूंची आहेत
राष्ट्रसेवा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.पाचवी ते दहावी या वर्गातील मुलांनी भावपूर्ण गीते,भारुड, देशभक्तीपर गीते,लोकगीते समाज प्रबोधनात्मक नाटिका (पृथ्वी वाचवा) मोबाईलचे दुष्परिणाम यासंबंधी प्रबोधन पर नाटिकाआदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील हे होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी राष्ट्रसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पाहुणे व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी केले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन बाजीराव सातपुते व संजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक सादर करताना शाळेचे मुख्याध्यापक यांनी सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक अधिक अभ्यास करून शिरोली गावचे नाव उज्वल करावे आजची पिढी कोणकोणत्या कारणामुळे बिघडत चाललेले आहे व मोबाईलचे होणारे दुष्परिणाम याविषयी शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी बोलताना व्यक्त केले तसेच शाळेतील सर्व माता-भगिनींना राजमाता जिजाऊ सारखे आपल्या पाल्यांना घडवावे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांच्यासारखे बुद्धिबान व कर्तुत्वान होण्याचे ध्येय ठेवावे असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावेळी आवाहन केले. तसेच शाळेचे आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी म्हणून कुमार आदित्य विनायक नेर्लेकर व कुमारी अमृता हनुमंत साळुंखे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच चला डोक्यात दगड भरूया हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विज्ञान विषयाच्या अध्यापिका सौ.जे.व्हि.गंगाधरे व भूगोल विषयाचे अध्यापक ए पी चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सौ एस .एस. कुंभार मॅडम व शाहरुख मनेर सर यांनी सांभाळली. हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जी ए वागवे ,कु . वसुंधरा पवार , दर्शनी पवार शाळेची माजी विद्यार्थिनी शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.सदर कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील सर यांनी मानले तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला.