ताप येतो,थंडी वाजून येते आणि काही दिवसातच सांधे आखडायला लागतात,सांध्याची हालचाल वेदनायुक्त वाटायला लागते यालाच “चिकन गुन्या “म्हणतात.
चिकन गुन्या एक प्रकरच्या ढासाच्या चावण्यामुळे होतो.
लक्षणे –
सर्व सांधे अखडणे, सांध्यांना सूज येणे, प्रचंड वेदना होणे, ताप, थंडी, डोकेदुखी हि सर्व लक्षणे आढळून येतात, ती 3-4 आठवडे असतातच.
तपासणी –
चिकन गुन्या ची रक्तातील तपासणी.
अपथ्य (खाऊ नये )-
नॉनव्हेज, दूध, दही, दुधाचे जड पदार्थ,कफ वात वर्धक आहार, हरभरा, पावटा, वरणा, बटाटा, रताळी, पालेभाज्या, थंड पाणी, कोल्ड्रिंक, उडीद, पापड, लोणचे.
पथ्य (खावे)-
हलका आहार,राजगिरा लाडू, कोमट पाणी, लसूण, कांदा, लिंबू,मोसंबी, संत्री, शिजवून देणे (काकडी, बिट, गाजर )दुधीभोपळा, शेवगा, घेवडा, ताक, पडवळ, दोडका, भेंडी, गवारी, वांगी, कारले, मध, ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, ज्वारीची भाकरी, भात.
आयुर्वेदिक उपचार –
चिकन गुन्या ची चिकित्सा आमवाता प्रमाणे करावी.
नाडी स्वेदन, पोट्टली स्वेदन,वमन चिंचालवण तेलाची बस्ती, लंघन.
आयुर्वेदिक कल्प –
आमवातारी रस, महावात विध्वंसवटी,रास्नादी गुग्गुळ, दशमुलारिष्ट.
उपाय –
1) निर्गुण्डी,रास्ना, एरंडमूळ, सुंठ,गुडूची,शंख भस्म, हिंगुळ भस्म,अश्वगंधा,मुक्ता शुक्ती भस्म, वंग भस्म एकत्रित करून गरम पाण्यातून 2चमचे दिवसातून 2वेळा घ्यावे.
2) एरंडेल तेल जेवणाआगोदर 1चमचा दररोज घ्यावे.
3) पारिजातकाच्या पानांचा काढा यावर गुणकारी आहे.
4) काळ्या वाळूचा शेक सकाळी -संध्याकाळी घ्यावा.
5) रात्री झोपताना बजरंग लेप /दशांग लेप रात्री लावावा व सकाळी कोमट पाण्याने धुवावा.
6) AC /फॅन चा वापर टाळावा.
7) टाईल्स फारशी घरात असेल तर घरात स्पंजचे चप्पल वापरावे.
8) थंडी पासून काळजी घ्यावी.
9) कोमट पाण्याचे सेवन करावे.
10) आठवड्यातून 2वेळा स्टीम बाथ घ्यावा, जेणेकरून सांध्याची हालचाल पुर्ववत होईल.
11) मेथीचे लाडू यात गुणकारी आहेत.
12) आहारात देशी गाईचे तूप वापरावे.
13) शिलाजीत रसायन व गिलोय घनवटी चे सेवन करावे.
14) भस्रिका,कपालभाती,अनुलोम -विलोम,भ्रामरी, उदगीत, प्रणव प्राणायाम हे योगाभ्यास नियमितपने करावेत.
15) ॲक्युप्रेशर /ॲक्युपंक्चर चा वापर करावा.
16) चुंबकीय चिकित्सा देखील यात महत्वपूर्ण आहे.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340