‘या’ शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर / प्रतिनिधी

आधारभूत किंमत खरेदी योजना 2023-24 अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली आहे.

 

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खालील ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु केली आहे.चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे,आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री

 

संघ मर्यादित तालुका आजरा,राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे, राधानगरी तालुका ज्योर्तिलिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे,कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्यो ग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर,भुदरगड तालुका

 

शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी,भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर.शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी 2 हजार 183 रु. व रागी

 

(नाचणी) करिता 3 हजार 846 रु. प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. 15 जानेवारी 2024 होती. परंतु शासन स्तरावरुन शेतकरी नोंदणीस दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत वाढ दिली असुन अद्याप नोंदणी न केलेल्या शेतक-यांनी हमीभावाने धान व नाचणी विक्री करीता वरील ठिकाणी

 

नोंदणी करावी, असे अवाहनही जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. खाडे यांनी केले.अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापुर,गडहिंग्लज,अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहु मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपर्क करावा.

Spread the love
error: Content is protected !!