बारा बलुतेदार व अठरा अलूतेदारांचे प्रधानमंत्री विश्वकर्मा व प्रधानमंत्री कारागीर योजनेतून जीवन समृद्ध होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या दोन कल्याणकारी योजना साकारल्या आहेत.या योजनांमध्ये सहभागी होऊन जीवन समृद्ध करा व संसार स्वावलंबी करा,असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी
केले.कसबा सांगाव ता.कागल येथे आयोजित योजनांच्या लाभार्थ्यांना श्रम कार्ड वाटप व नवीन नावनोंदणी शिबिरात ते बोलत होते.कसबा सांगाव ता.कागल येथे आयोजित योजनांच्या लाभार्थ्यांना श्रम कार्ड वाटप व नवीन नाव नोंदणी शिबिर पार पडले.अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
दीपक गंगाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना या योजनांचे लाभ घरोघरी पोहोचवू. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुतार,लोहार,सोनार (दागिने कारागीर),कुंभार,न्हावी,माळी (फुल कारागीर),
धोबी, शिंपी,गवंडी,चर्मकार,अस्त्रकार,बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनवणारे, कुलूप बनवणारे, विणकर कामगार,बुरुड आणि पाथरवट या व्यावसायिकांचा समावेश आहे.प्रधानमंत्री हस्तकला कारागीर योजनेअंतर्गत सुतार, लोहार,सोनार (दागिने कारागीर), कुंभार, गवंडी, चर्मकार,अस्त्रकार,
बोट बांधणारे,अवजारे बनवणारे,खेळणी बनवणारे,कुलूप बनवणारे या व्यावसायिकांचा समावेश आहे.कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील एकही लाभार्थी वंचित रहाणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून या दोन्ही योजना निर्माण झाले आहेत.
यामध्ये बारा बलुतेदार आणि 18 आलं ते दार वर्गातील लोकांच्या कौशल्यामध्ये वाढ व व्यवसायवाढ हा मुख्य उद्देश आहे.ही कुटुंबे सुखी झाली तरच देशाचा विकास होईल.व्यासपीठावर कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र माने,माजी सरपंच श्री. कांबळे, विठ्ठलराव चव्हाण,सुरेश लोखंडे,अमोल माळी,
किरण पास्ते, मोहन आवळे,बाळासाहेब दाईंगडे, उमेश माळी, के.आर.पाटील,काशीम मुल्ला, अशोक पाटील, अमर शिंदे,अमर कांबळे, संजय आवळे आदी प्रमुख उपस्थित होते.