माजी मंत्री राजेश टोपे – आमदार यड्रावकर यांची बंद खोलीत चर्चा

जयसिंगपूर/प्रतिनिधी

माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी शनिवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवासस्थानी भेट घेतली.यावेळी माजी मंत्री टोपे व आमदार यड्रावकर यांची बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

 

चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही.मात्र सद्याची राजकिय परिस्थिती व घडामोडीवर खलबते झाल्याचे समजते.माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे हे इचलकरंजी येथे बालाजी शिक्षण समुहाच्या कार्यक्रमासाठी शनिवारी आले होते.

 

सायंकाळी 4.45 वा त्यांनी खास वेळ काढून जयसिंगपूर येथे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवासस्थानी भेट घेतली.सुमारे दीड तास ते आमदार यड्रावकर यांच्या निवासस्थानी होते.यावेळी आमदार यड्रावकर यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांचा सत्कार केला.

 

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे,माजी नगरसेवक राजेंद्र झेले,दादासो पाटील चिंचवाडकर, संजय नांदणे,अजित उपाध्ये,राहुल बंडगर,महेश कलकुटगी,अमोल शिंदे,सचिन देशींगे,प्रतीक चौगुले उपस्थित होते.

 

यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली.सद्या राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडत आहेत.या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राजेश टोपे यांनी आमदार यड्रावकर यांची भेट घेतल्याने चर्चेला उत आला आहे.

 

बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.मात्र राजकिय परिस्थिती व घडामोडीवर अनेक खलबते झाल्याचे समजते.राज्यात भाजपा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता आहे.

 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. देशात लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत.

 

या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असून माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची खास भेट घेवून बंद खोलीत चर्चा केल्याने उत्सुकता ताणली आहे.

Spread the love
error: Content is protected !!