कुरुंदवाड येथे प्रभू श्री राम अक्षता कलशाचे जल्लोषात स्वागत झाले.कलश आणि वेशभूषेतील श्री राम-सीता यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी टाळ मृदंगाच्या निनादात,लेझीम,झंझ पथक आणि जय श्री रामच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढली होती.ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव देखिल करत मंगल अक्षता कलशाचे स्वागत केले.महिलांनी फुगड्याचे फेरे घेत आनंद साजरा केला.कुरुंदवाड येथे समाजबांधवांनी राम-सिता,
लक्ष्मण-भरत,हनुमान यांच्या वेशभूषा साकारलेल्या मुला-मुलींच्या मिरवणुकीसाठी अश्वारूढ रथ तयार केला होता.हुबेहूब वेशभूषा पाहून नागरिक भारावले होते.मिरवणूक मार्गावर फुलांच्या रांगोळ्या आणि पायघड्या घातल्या होत्या.हलगी,वारकरी संप्रदाय टाळ्यांच्या गजरात व धनगरी ढोल या सर्व वाद्यासह असंख्य गावकऱ्यांच्या सहभागाने श्री राम अक्षता कलक्षाची मिरवणूक फुलांच्या वर्षावात पार पाडली.यावेळी श्री रामरक्षा पठण करून आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.या मिरवणुकीमध्ये सर्व बाल गोपाळ अबाल वृद्ध भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता.मिरवणूक गणपती मंदिर पासुन भैरववाडीसह शहराला प्रदिक्षना काढण्यात आली.सीताबाई पटवर्धन हायस्कुलचे विद्यार्थी,शहरातील मान्यवर,ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सपोनि रविराज फडणीस यांनी शहरातील व बाहेरील वाहतूक बाह्यमार्गावरून काढली होती.तबल 4 तास शहरातून मिरवणूक सुरू होती.यावेळी शरदचंद्र पराडकर ॲड विजय जमदग्नी,अमेय जमदग्नी,प्रफुल्ल पाटील,भरत बिडकर सह आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.