विद्यार्थ्यांनी अनुभवले पोलीस ठाण्यातील कामकाज, पोलिसांनी दिले कायद्याचे धडे

शिरोळ / प्रतिनिधी

मुलांना पोलिसांबद्दल भीती वाटू नये पोलीस हे आपले मित्रच असतात.तसेच पोलीस ठाण्यातील कामकाज कसे चालते कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या,कोणत्या इतर विभागाकडे,पोलीस त्यांची शस्त्रे कशासाठी आणि

 

कोणत्या वेळी उपयोगात आणतात आदींची माहिती शिरोळ पोलिस ठाण्यात श्री पद्माराजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची माहिती दिली.यात पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते? ठाणे अंमलदार,मुद्देमाल

 

याबाबतची माहिती तसेच शस्त्रास्त्रांचीही माहिती त्यांनी मोकळेपणाने दिली.जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅसगनचा कसा उपयोग केला जातो.याशिवाय, नाइन एमएम पिस्तूल, कार्बाईन,सेल्फ लोडेड रायफल आदी आधुनिक

 

शस्त्रांचीही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीसकाकांकडून जाणून घेतली.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, हवालदार दिलीप कुंभार यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.तर उज्वला खाडे,राजेंद्र ओमासे यांनी

 

मोबाइल,पाकीटचोरी परिसरातील हाणामारी किंवा छेडछाडीची तक्रार कशी द्यायची,तक्रार कुठे व कशी द्यायची याची माहिती दिली.यावेळी अविनाश माने, व्हि.ए.गवंडी,आयुब मुजावर,ए.व्हि.जाधव, पोलीस

कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!