उत्सव व उरूस काळात पालिकेचे नियोजन योग्य अधिकाऱ्यांचा केला सन्मान

शिरोळ / प्रतिनिधी

 

शिरोळ शहरात श्री. बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरुस सालाबादप्रमाणे अमाप उत्साहात साजरा झाला.उरुसानिमित्य शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता आणि आरोग्य

 

सुविधा विषयी काटेकोर नियोजन करून जनतेला मूलभूत सुविधा पुरवत उत्सव आणि उरूस पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे शिरोळ शहराध्यक्ष शहाजी गावडे यांनी पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार केला

 

डिसेंबर महिन्यात शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरुस धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला यानिमित्त शहरात मोठ्या संख्येने पै पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी आले होते. या सर्वांची व्यवस्था करणे सर्व

 

शहरवासीयांना क्रमप्राप्त होते, यावर्षी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नोव्हेंबरअखेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता त्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली. पण नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत

 

चांगल्या व काटेकोर नियोजनानुसार उत्सव आणि उरुस कालावधीमध्ये दिनांक ४ डिसेंबर २०२३ ते८ डिसेंबर २०२३ अखेर पाणी पुरवठा अत्यंत सुरळितपणे पुरवण्यात आला त्यामुळे शिरोळ शहरवासिय अतिशय

 

सुखावले गेले तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली जनतेला आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या विशेषता पाणी पुरवठा सुरळित केल्यामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव, पाणीपुरवठा अधिकारी

 

अमन मोमीन, कार्यालयीन अधिक्षक संदीप चुंडमुंगे, पाणी पुरवठा विभाग अधिकारी अर्जुन बल्लारी तसेच पाणी पुरवठा विभागातील सर्वच कर्मचारी यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे शिरोळकरांना या काळात

 

चांगल्या सुविधा मिळाल्या यामुळेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे असे वाटते असे आशयाचे पत्र शहाजी गावडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष

 

अमरसिंह पाटील अधिकारी अमन मोमीन सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह शिंदे यांच्या पालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!