दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील अतिक्रमणे हटवली

Spread the love
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख आलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातुन श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी लाखो भाविक श्री दत्त दर्शनासाठी येत असतात दरम्यान यंदा श्री दत्त जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असलेला अनेक दुकानदार आणि व्यवसायीकानी आपल्या दुकानच्या नावाचे बोर्ड तसेच दुकानातील साहित्य तसेच मिठाई दुकानासमोर असलेले अतिक्रमण काढून घ्यावे असे आव्हान शिरोळ पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले दरम्यान शनिवार,रविवार आज सोमवार अशी तीन दिवस सुट्टी असल्याने नृसिंहवाडी श्री दत्त दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी आपल्या पोलीस पथकाला सोबत घेऊन मुख्य मार्गवर असलेल्या दुकानासमोरील अतिक्रमणे काढून घेतली आणि भाविकांसाठी मार्ग खुला करून दिला.तसेच दत्त जयंती पर्यत कोणत्याही दुकानदारानी दुकांनासमोर कोणतेही अतिक्रमण करू नये आणि तसे आढळून आल्यास त्या दुकानदार विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले
error: Content is protected !!