दत्तजयंती निमित्त जयसिंगपुरात श्री चंडीयाग संपन्न

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ दरबार,जयसिंगपुर येथे दत्तजयंती निमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन करत चंडी याग संपन्न झाला.व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
आज सप्ताहाच्या पाचव्या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक झाला.त्यानंतर सकाळी 8 ची भूपाळी आरती संपन्न झाली.त्यानंतर चंडीयागास सुरुवात झाली आरतीनंतर सामुहिक श्री स्वामी समर्थ मंत्र,जयजयकार करण्यात आला.दिवसभर महिलांची प्रहरे सेवा अखंडित व रात्री पुरुष प्रहरे सेवा अखंडित सात दिवस सुरु आहे.सायंकाळच्या सत्रात सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा,सायंकाळची आरती झाली.आरतीनंतर मार्गदर्शन झाले.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र व भक्तनिवास,

मधून दररोज सकाळी व संध्याकाळी जयसिंगपूर मधील हॉस्पिटल मध्ये मोफत डबे पेशंटना देण्यात येतात. दि.24 रोजी मल्हारी याग व रुद्र याग होणार आहे. दि.२६ रोजी दुपारी 12.39 वा. श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे. दि. २७ रोजी सकाळी 10.30 वा महाआरती श्री सत्यदत्त पूजन,अखंड नाम,जप यज्ञ याग सप्ताह सांगता होणार आहे.

error: Content is protected !!