नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर तसेच समोरच्या बाजूस श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर समोरच्या बाजूस खासदर धैर्यशील माने यांचा डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र झाकून गेले आहे.त्यामुळे ऐन दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्राची शोधा-शोध करावी लागणार आहे.त्यामुळे तातडीने ग्रामपंचायतीने सदरची डिजिटल फलक काढावीत अशी मागणी जोर धरत आहे.दत्त जयंती निमित्त श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी महाराष्ट्र देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत.भाविकांच्या सेवेसाठी येथील आरोग्य केंद्राचे पथक सज्ज झाले आहे.मात्र,आरोग्य केंद्रच खासदार व ग्रामपंचायत व व्यवसायिक डिजिटल फलकात झाकून गेले असल्यामुळे रुग्णांना आरोग्य केंद्र शोधून सुद्धा सापडत नाहीये,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राजकीय पक्ष,व्यवसायासह काहीजणांनी डिजिटल बोर्ड लावल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.सदरची फलक तातडीने काढण्यात यावीत,तशी मागणी आता जोर धरत आहे.