आ.शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून बेडकिहाळ येथे लाभार्त्याना गॅस किटचे वितरण

Spread the love

बेडकीहाळ / प्रतिनिधी

 

उज्ज्वला योजने अंतर्गत बेडकिहाळ येथील 17 लाभार्त्याना बीरेश्वर बँक शाखा बेडकिहाळ येथे निपाणी भागाच्या आमदार,माजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या गॅस किटचे वितरण कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब शिंदे यांनी करून आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून गरजूना आजवर शेकडो गॅस किट मंजूर करून धूर मुक्त गाव करण्याचा प्रयत्न करण्यात आले असून, पुन्हा 17 महिलांना गॅस किट मंजूर करून दिले असल्याचे ते सांगितले. तर या नंतर हि गरजू लोकांना गॅस कीटचे वितरण करण्यात येणार असून गरजूनी आवश्यक कागद पत्रांसह बीरेश्वर बँक शाखेत संपर्क साधावा असे आवाहन केले.या प्रसंगी बेडकिहाळ येथील नामदेव शिंपी समाजाला जेवनाची भांडी घेण्यासाठी जोल्ले उद्योग समूहाकडून 8 हजाराचा आर्थिक मदतिचा धनादेश समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यकर्त्यांनी सुपूर्द केला. तसेच गेल्या ऑगस्ट महिन्यात येथील शेतकरी उमेश मोहिते यांच्या पालखी मळा परिसरातील खोपीतील 5 शेळ्या मोकाट कुर्त्यांच्या हल्ल्यात दगावल्या होत्या. नुकसानग्रस्त या शेतकऱ्याला जोल्ले उद्योग समूहाकडून 5 हजाराचा अनुदान वितरण करण्यात आले.
या वेळी जोल्ले उद्योग समूहाचे संचालक मलगौडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी शिवनेरी संस्थेचे संस्थापक आर जी डोमणे, बाबासाब उपाध्ये , शौकत मुल्ला, ओंकार चौगुले, रवींद्र हुन्नरगी, विलास थरकार, शिवाप्पा सुभेदार, मारुती निकम, तात्यासाहेब केस्ते, सुनील नारे, सुखमार जाधव, भगवंत देसाई, चंद्रकांत काकडे, निलेश काकडे, विश्वनाथ काकडे, बाळासाहेब बोंगाळे, व लाभार्थी महिला वर्ग उपस्तित होत्या.

error: Content is protected !!