कोल्हापूरकरांचा थेट पाईपलाईन योजनेला गळतीचे ग्रहण…

राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता.राधानगरी) येथे आज पहाटे मोठ्या प्रमाणावर गळती लागली.या गळतीमुळे आसपासच्या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले.शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.सायंकाळी पाच नंतर गळती कमी झाली.मात्र थेट पाईपलाईनमुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण अशी विचारणा केली जात आहे.या परिसरात गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा पाईपलाईनला गळती लागली आहे. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणाचे पाणी देण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्चून पाईपलाईन योजना अखेर सुरू झाली. मात्र या योजनेला गळतीचे ग्रहण लागले आहे.आज मध्यरात्री तुरंबे कपिलेश्वर मार्गावर बाळासाहेब शेटगे यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आणि पाईपलाईनमधून पाणी वाहू लागले.गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.शिवाय या परिसरातील ऊस पिकामध्ये पाणी शिरल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले.
Spread the love
error: Content is protected !!