कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे खाज येत असते.अशावेळी खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून मालीश करा.खोबऱ्याचे तेल उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे.त्याचा प्रभाव थंड असतो. ज्यामुळे खाजेपासून मुक्तता मिळते.कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो.डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी केसांच्या मुळापाशी कोरफडीचा गर लावून हलक्या हाताने चोळा.असे केल्याने कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल,असे केल्याने डोक्याला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळेल.केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखल्याने खाज येते.म्हणून केस वेळच्या वेळी धुण्याची सवय लावा.ऑलिव्ह ऑईल गरम करून कोमट होऊ द्या. हे तेल डोक्याच्या त्वचेवर लावून चांगली मालीश करा.हे तेल रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुऊन घ्या.