श्री.स्वामी समर्थांच्या पालखी स्वागतासाठी शिरोळ नगरी सज्ज

Spread the love

शिरोळ शहरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी येत्या 20 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन,,

शिरोळ  / प्रतिनिधी

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या 20 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन होणार आहे.याची जय्यत तयारी समस्त शिरोळकर स्वामी सत्संग मंडळ व वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात येत आहे.शिरोळ  शहरातील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या वतीने गेली 26 वर्षे झाली.श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते येत्या २० डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पालखीच्या आगमन संत पूजा,दिंडी पूजन,नामस्मरण, भजन सेवा,अन्नपूर्णा पूजन,श्रींची महाआरती झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.राजीव भैया यांचे ,जगूया जीवन रोगमुक्त तणावमुक्त,या विषयावर  प्रबोधनपर  व्याख्यान  दुपारी चार वाजता प्रसायदान  झाल्यानंतर श्रींची पालखी मौजे आगरकडे रवाना होणार आहे.हा सोहळा बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्तांनी दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहनही संयोजकांनी करण्यात आले आहे.या मंगल सोहळ्यासाठी ज्या भक्तांना वस्तू ,द्रव्य देऊन  स्वामी सेवा करायची इच्छा आहे त्यांनी चंद्रकांत महात्मे,रवींद्र महात्मे ,दिलीप माने,धनाजी आरगे, संतोष बनने,उत्तम पाटील, वसंत चुडमुगे, मोहन पुजारी,सुरज काळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा तात्कालीन गट विकास अधिकारी  माजी सनदी अधिकारी ह भ प गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांनी 26 वर्षांपूर्वी सुरू केली शिरोळ व तालुक्यात तालुक्यात हजारो स्वामीभक्त  आहेत.स्वामी समर्थांच्या पालखी स्वागतासाठी शिरोळ नगरी सज्ज झाली आहे यानिमित्त स्वामी समर्थचा नामजप जागर होणार आहे.

error: Content is protected !!