शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीचा पहिला ठराव: सभापती मिलिंद कुरणे

Spread the love

शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीचा पहिला ठराव: सभापती मिलिंद कुरणे

 

मुख्याध्यापक रविंद्र सिदनाळे सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

 

हेरवाड / प्रतिनिधी 

“शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीने संपूर्ण राज्यात प्रथम ठराव करून आदर्श निर्माण केला आहे. गुरुचे स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचे असून, सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देत राहावे,” असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे यांनी केले.

​कुबेर हॉल दत्तवाड येथे आयोजित आदर्श शिक्षक रविंद्र सिदनाळे यांच्या सेवानिवृत्ती व सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्व उपस्थितांनी सिदनाळे गुरुजींच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.

​ शिक्षक नेते ​राजाराम वरूटे म्हणाले की, “रविंद्र सिदनाळे हे केवळ एक शिक्षक नसून शाळा आणि शिक्षक संघटनेच्या न्याय्य हक्कांसाठी सतत धडपडणारे नेतृत्व आहे.”

​बबन चौगुले यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,”सिदनाळे सर हे मनाने चिरतरुण असून त्यांनी निवृत्तीनंतरही समाजासाठी आपले कार्य असेच अविरत सुरू ठेवावे.”

​विजितसिंह शिंदे (सरकार) म्हणाले की, “सिदनाळे सरांचा अनुभव दांडगा असून सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून मार्गदर्शन करत राहावे.”

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घडलो: सत्कारमूर्ती रविंद्र सिदनाळे

​सत्काराला उत्तर देताना रविंद्र सिदनाळे भावूक झाले. ते म्हणाले, “मामा महावीर उपाध्ये यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहू शकलो. मुख्याध्यापकांच्या शिस्तीमुळे वेळेचे भान आणि गुणात्मक वाढ साध्य झाली.तसेच मला मिळालेल्या आदर्श सहकाऱ्यांच्या भक्कम साथीमुळेच मी माझ्या कारकिर्दीत उत्तम काम करू शकलो.”

​ अध्यक्षस्थानी महावीर उपाध्ये हे होते.प्रास्ताविक राजू जुगळे यांनी केले.या सोहळ्याला सौ.बबीता बाबासाहेब वनकोरे,माजी सरपंच चंद्रकांत कांबळे,राजगोंडा पाटील (गुमटे),आई चळणादेवी सिदनाळे, बाजीराव कांबळे,प्रशांत पोतदार, राजू जुगळे,केंद्र प्रमुख सुभाष कुरूंदवाडे,संजय निकम यांचेसह टाकळीवाडी,हेरवाड,दत्तवाड

परिसरातील शिक्षक,ग्रामस्थ, पालक,नातेवाईक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी सिदनाळे सरांना पुढील वाटचालीस व निरोगी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वागत गुंडा परीट यांनी केले तर आभार कुमार सिदनाळे यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!