सर्वदूर पोहचली शिरोलीच्या सर्वेश्वर महादेवाची कीर्ती

Spread the love

सर्वदूर पोहचली शिरोलीच्या सर्वेश्वर महादेवाची कीर्ती

 

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हुंकारे 

गावातील लोकांत भक्ती वाढविण्यासाठी कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसाद करण्यास सुरुवात केली. कालांतराने महाप्रसादाचा मान हुवाळे व शिरगावकर घराण्याकडे आला. महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन घराण्यांमार्फत जोशी यांच्या घरी महाप्रसादाचे साहित्य दिले जाते.

सन १८०३ मध्ये शिरोली गावाच्या पश्चिमेला सखल नावाच्या शेतवडीत म्हणजेच सर्वेश्वर तलावामधील सर्वेश्वर शिवलिंगाची स्थापना मार्तंड कृष्णाजी जोशी, भाऊसो पोतनीस, बाळ्या स्वामी व कुलकर्णी या प्रमुख लोकांनी गावातील स्वामीच्या मठाजवळ केली. या लिंगाची पूजा करण्याची जबाबदारी नारायण श्रीपाद जोशी घराण्याकडे देण्यात आली.

१९९८ पर्यंत हे महादेवाचे मंदिर कोलारू व पत्र्याच्या शेडमध्ये २५ बाय ३० जागेत होते. या मंदिरामध्ये फक्त महांनदी व लिंग होते. कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन करण्यास सुरुवात केली.

सर्वप्रथम सन १८०३ मध्ये सखल शेतवडीत सर्वेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. सन १९९८ पर्यंत या मंदिराला प्रथ्याचे शेडवजा कोलारू घराचे स्वरूप होते. दिवसेंदिवस सर्वेश्वर महादेवाची ख्याती आणि महिमा सर्वदूर पोहचू लागली. त्यातून विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाऊ लागले. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. सध्या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.

कालांतराने पुढे महाप्रसादाचा मान हुवाळे व शिरगावकर घराण्याकडे सोपविण्यात आला. या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी व गावात भक्तीमय वातावरण टिकून राहण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात १९६८ पासून बाजीराव पाटील, यशवंत पाटील, चंपाबाई सुतार, भागिरथी परिट, विजय यादव या प्रमुख मंडळींनी केली.

प्रत्यक्षात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी १९९१ साली गावातील लोकांची एक कमिटी स्थापन करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली लोकवर्गणी गोळा करून प्रत्यक्षात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. सुरुवातीस मंदिराच्या परिसरात कुपनलिका खोदण्यात आली. ६ लाख खर्च करून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!