शिये येथे जुन्या वादातून प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

करवीर तालुक्यातील शिये येथील श्रीराम नगर परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून एकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसातुन मिळालेल्या माहिती अशी की, शिये ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. १८८३/१ मधील मालकी हक्कावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जुना वाद सुरू आहे. या वादाचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. ५ मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी विकास रघुनाथ पाटील आणि जखमी अवधूत विष्णू पाटील हे संबंधित जागेतील शेडमध्ये इलेक्ट्रिकल साहित्य ठेवत होते. यावेळी आरोपींनी तिथे येऊन “तुझा इथे काय संबंध आहे?” असे म्हणत वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी मधुकर पाटील याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने अवधूत पाटील यांच्या डोक्यात गंभीर वार केला. तसेच अन्य आरोपींनीही फिर्यादीला धक्काबुक्की करत जखमीला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी: मधुकर गणपती पाटील, तुषार मधुकर पाटील, सुवर्णा मधुकर पाटील (सर्व रा. माळवाडी, पाटील गल्ली, शिये) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत अवधूत विष्णू पाटील (वय ४२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गून्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. बी. चौरे करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!