महिला कुस्तीतील..!बहुमानाची” महाराष्ट्र केसरी गदा” विजेती पैलवान अमृता शशिकांत पुजारी
शिरोळ / सचिन उर्फ शशिकांत पवार
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राजाआश्रय मिळालेला खेळ म्हणजेच कुस्ती पुरुषांच्या कुस्ती बरोबरच महिलांचेही मन-मनगट आणि मस्तक तंदुरुस्त व्हावे म्हणून नुकतेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांनी महिलांना प्रोत्साहन म्हणून महिलांचा सक्षमीकरण व्हावं
म्हणून महिला कुस्ती” महाराष्ट्र केसरी गदा..”सुरू केली. १२ डिसेंबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे झालेल्या महिला कुस्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिरोळ नगरीची कन्या पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिने तिची गतवर्षाची स्पर्धक आणि विजेते असणारी पैलवान “महाराष्ट्र केसरी”
विजेती प्रतीक्षा बागडी हिचा थोडी प्रतीक्षा करून अतिशय जिद्दीने आणि शांत संयम राखून प्रामाणिक आणि खिलाडी वृत्तीने खेळ करून तिचा पराभव केला.आणि शिरोळ नगरीची कन्या” महाराष्ट्र केसरी गदा” शिरोळ नगरीत आणली.
ऐतिहासिक शिरोळ नगरीतील बारा बलुतेदार जाती धर्मातील पंथातील समाजापैकी एक समाज म्हणजेच “धनगर समाज”आणि असा हा समाज म्हणजेच अतिशय कष्टाळू काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मेंढ्या चारण्यासाठी सतत
भटकंती करणारा.बिरोबावर भक्ती आणि त्याच्या भंडाऱ्यावर नितांत श्रद्धा असणारा धनगर समाज आणि अशाच एका धनगर समाजातील आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या अमृताने आपल्या वडिलांचे स्वप्न खरोखर आज साकार केले.
पैलवान अमृताचे वडील शशिकांत पुजारी हे अतिशय स्वभावाने शांत आणि गरीब तसेच प्रत्येकाला बोलून चालून सुसंवाद साधणारे घरची शेती म्हणावी तशी म्हणजे पोटापुरतीच आणि म्हणूनच घर खर्च आणि प्रपंच
चालावा यासाठी श्री दत्त सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ येथे कामगार म्हणून कार्यरत असणारे शशिकांत पुजारी आणि आपल्या या तुटपुंज्या आर्थिक नियोजनातून आपल्या मुलीला पैलवान करणे यासाठी खाना खुराक,कसरत यावर खर्च करणे म्हणजे तारेवरची
कसरतच अशा परिस्थितीतून पैलवान अमृताने आपल्या या कौटुंबिक परिस्थितीची जाण आणि भान राखून तिने सुद्धा प्रामाणिक कुस्तीवर निष्ठा ठेवून व्यायाम,कष्ट कसरत करून “महाराष्ट्र केसरी” या रूपाने विजयश्री खेचून आणून आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर अखंड
शिरोळ नगरीचे आणि ती प्रतिनिधित्व करीत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे नावलौकिक केले.तिच्या या यशाने शिरोळकरांचा उर अभिमानाने भरून आला.तिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे तिच्या वडिलांचा कारण” महाराष्ट्र केसरी” या पदापर्यंत अमृताचा प्रवास म्हणजेच
एक खडतर असा प्रवास आणि हा प्रवासात सदैव हिमालयासारखा पाठीशी असणारा तिचा खंबीर बाप तिच्या सोबत सावली म्हणून आधार देणारा वटवृक्षासारखा बाप पराभवाने खचून न जाता जिद्दीने आणि ताकदीने लढाईसाठी प्रवृत्त करणारा बाप म्हणजेच…श्रीयुत शशिकांत पुजारी खरोखर महिला महाराष्ट्र कुस्तीतील.. २०२३ या वर्षाची “महाराष्ट्र केसरी
गदा.”विजेती पैलवान अमृताचे कौतुक आणि अभिनंदन तर आहेच.याचबरोबर या यशामध्ये तिच्या वडिलांची सुद्धा अपार त्याग,अपार सेवा आणि अपार कष्ट यामध्ये नक्कीच दिसून येतात. खरोखर मुलीने बापाचे नाव केले ही गोष्ट अभिमानास्पद आहेच.याचबरोबर शिरोळ
नगरीचे सुद्धा नावलौकिक केले.तिच्या या यशस्वी घोडदौड आणि बहुमानाचा महिला कुस्ती “महाराष्ट्र केसरी” गदा आणि किताब मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.तिच्या पुढील महिला कुस्ती क्षेत्रातील प्रवासासाठी तिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर असेच
यश मिळवावे.आपल्या गावाचे कुटुंबाचे आणि समाजाचे एकंदरीतच आपल्या भारत मातेचे नावलौकिक करावे. यासाठी तिला भगवंताने शक्ती,भक्ती,बुद्धी द्यावी..!
शिरोळकरांचे सदैव शुभ आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच.पै अमृताला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!