पुलाची शिरोली येथील ३० जणांनी राष्ट्रीय , राज्यस्तरीय , जिल्हास्तर , तालुकास्तरीय खेळात उज्वल प्राविण्य मिरवणाऱ्या खेळाडूंचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील ३० जणांनी राष्ट्रीय , राज्यस्तरीय , जिल्हास्तर , तालुकास्तरीय खेळात उज्वल प्राविण्य मिरवणाऱ्या खेळाडूंचा ग्रामपंचायतीच्या वतीने छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे होत्या तर प्रमुख उपस्थिती ग्रामविकास अधिकारी गिता कोळी होत्या .शिरोली पुलाची गावातील १४ वर्षीय खेळाडूनी डेरवण जि.रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिरोली हायस्कूल शिरोली संघाने प्रथम क्रमांक संपादन करत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. शिरोली च्या कबड्डी इतिहासात हि घटना प्रथमच घडली आहे. या संघातील तीन खेळाडूंचा बिलासपुर, छत्तीसगड येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात अवधूत अनिल सोडगे , विराज महेश बोळाज , अर्जुन उमेश माने यांची निवड झाली आहे . तर डेरवण येथील स्पर्धेत अजिंक्य अजित बेडगे , सिद्धार्थ संग्राम कोरवी , समर्थ मनोज अवघडे, सत्यजित संदीप कांबळे ,शौर्य संदीप कोळी, रुद्र केरबा झांजगे , राजवीर संदीप पाटील ,प्रज्वल प्रकाश माने , स्वयंम धनंजय पाटील यानी कबड्डीत उत्कृष्ट खेळ करत संघास विजेते पद पटकावून दिले . या संघास मार्गदर्शन करणारे आर.एस. पाटील सर , दीपक पाटील सर , कुबेर पाटील सर, रावासो मारापुरे सर , नितीन पद्माई सर व संघास प्रशिक्षक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडणारे नामदेव गावडे सर , संभाजी गावडे सर , सचिन कोळी सर यांचा ही सत्कार करण्यात आला .संस्कार बाबू भोसले , अथर्व सुनील गावडे , समर्थ सतीश पाटील , कु. रुद्राक्षी सतीश पाटील , . पैलवान जिया तौफिक संदे , कु. आदिती शिवाजी करपे ,स्तवन सुहास शिरोलीकर , कु. वैष्णवी गुरेन्द्र सिंग , प्रणाली प्रवीण समुद्रे ,समृद्धी विष्णू गावडे , सायली गावडे , यांची कुस्ती , कॉरम, कबड्डी सारख्या खेळात राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय महाराष्ट्र संघात निवड झाली आहे तर विनायक पाटील , दादासो शिवाजी पुजारी यांनी प्रो कबड्डी स्टार, पुणेरी पलटण संघाचे प्रतिनिधित्व केल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे , प्रकाश कौंदाडे , योगेश खवरे , कमल कौंदाडे , कोमल समुद्रे , आदिसह उपस्थित होते .