यड्रावकरांचा राजकीय डाव; शिरोळ नगर परिषदेसाठी श्वेता काळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी श्वेता विश्वास काळे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.यड्रावकर यांच्या या निर्णयामुळे शिरोळ नगर परिषदेतील निवडणुकीत नवे समीकरण तयार झाले असून,आतापर्यंत एकत्र असलेल्या गणपतराव पाटील गटात फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.श्वेता काळे यांच्या उमेदवारीमुळे यड्रावकर यांनी गणपतराव पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातच मोठा राजकीय डाव टाकल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.दरम्यान जयसिंगपूर येथे माजी खासदार राजू शेट्टी,माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील आणि गणपतराव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुका राजर्षी शाहू विकास आघाडीच्या विरोधात लढविण्याची घोषणा केली.या आघाडीने यड्रावकरांविरोधात एकजूट दाखवत मोठे आव्हान उभे केले आहे.यड्रावकरांच्या गोटातून मात्र प्रत्युत्तर म्हणून श्वेता काळे यांची उमेदवारी देऊन राजकीय रणनीती आखण्यात आली आहे.या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि माजी सरपंच अर्जुन काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळाली आहे.शिरोळ नगर परिषदेची निवडणूक पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगणार हे निश्चित झाले असून,श्वेता काळे यांच्या उमेदवारीनंतर शिरोळ शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.आगामी काही दिवसांत यड्रावकर आणि पाटील गटात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!