गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफॉर्मर १० लाखाच्या तांब्यांच्या पट्ट्याची चोरी

Spread the love

मौजे वडगाव गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफॉर्मर अंदाजे १० लाख किमतीच्या तांब्यांच्या पट्ट्याची चोरी,अद्यापि शिरोलीतील झालेल्या तीन चोरींचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश,या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी

 

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

अज्ञात चोरट्यांकडून शिरोली

परिसरातील मौजे वडगांव येथील श्री गणेश सह . पाणीपुरवठा संस्थेच्या ६३० केव्हीचा ट्रान्सफार्मर फोडून अंदाजे दहा लाख तांब्याच्या वायर चोरी व इतर साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे . या घटनेमुळे संस्थेचे अंदाजे १० लाख रुपये नुकसान झाले आहे. शिरोलीतील तीन चोऱ्यांचाही छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी मौजे वडगाव येथील गणेश सह . पाणी पुरवठा संस्थेच्या मालकीच्या स्टेज नं . २ येथील ट्रान्सफार्मर मधून चोरट्यांनी ऑईल सोडून देऊन आतील कॉपर वायर , केबल पट्ट्या व इतर साहित्य चोरून अंदाजे १० लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.या चोरीची फिर्याद सचिव नरहरी वाकरेकर यांनी शिरोली पोलीस ठाण्यात दिली आहे. या पूर्वीही मार्च महिन्यात शिरोलीतील पांडुरंग पाणीपुरवठा,शिरोली विकास संस्थेचेही केबल,पट्ट्या,स्टार्टर चोरट्यांकडून लंपास केले आहेत.तर जुलै महिन्यात माणगावे यांचा ट्रान्सफॉर्मर फोडून दोन लाखाच्या पट्ट्या लंपास केल्या होत्या. चोरट्यांकडून चार महिन्याच्या अंतराने या चोरी केलेल्या आहेत.अद्यापि त्यां चोरट्यांना ताब्यात घेण्यास शिरोली पोलिसांना यश आलेले नाही. सध्या ऑक्टोबर महिना असून साखर कारखान्याकडून ऊस तोडी सुरू होणार आहेत. त्यामुळे ऊस तुटण्यापूर्वी उसाला पाणी दिले जाते. अशा चोरींच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होणार आहे. या गोष्टीचा विचार करून शिरोली पोलिसांनी या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून जोर धरू लागलीआहे.

Leave a Comment

error: Content is protected !!