चिंतामणी सेवक फाउंडेशन कोल्हापूर आयोजित स्कूल चले हम शालेय साहित्य वाटप

Spread the love

चिंतामणी सेवक फाउंडेशन कोल्हापूर आयोजित स्कूल चले हम शालेय साहित्य वाटप उपक्रम २०२५ सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी प्राथमिक विद्यामंदिर विलास नगर पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथे पार पडला.

 

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर विलास नगर पुलाची शिरोली येथे चिंतामणी सेवक फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत स्कूल चले हम हा उपक्रम राबविला जात आहे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जात आहे .

 

यावेळी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.माधवी सदाशिव पाटील तसेच तज्ञ संचालिका सौ. प्रतिभा पाटील, चिंतामणी सेवक फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष सोहम कुराडे, उपाध्यक्ष अमित जाधव, सचिव कुमारी वैष्णवी स्वामी ,कोषाध्यक्ष साहिल भाट व ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते .

या चिंतामणी सेवा फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या होतकरू व गरजू गोपाळ समाजातील व अनाथ मुलांना शालेय साहित्य कीट चे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लहू श्रावस्ती व श्री. कुंडलिक जाधव यांनी केले. सौ. रोहिणी भोपळे यांनी शाळेविषयी प्रास्ताविक माहिती दिली .शाळेच्या सचिव सौ. माधवी पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिकून खूप मोठे व्हा.

 

तुम्ही समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करा असे आवाहन केले.तसेच चिंतामणी सेवक फाउंडेशनचे अध्यक्ष सोहम कुराडे यांनी विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे योग्य वापर करावा गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा तुम्ही ही भविष्यात चिंतामणी सेवक फाउंडेशनचे सदस्य व्हावे असे आवाहन केले.

 

शेवटी शाळेचे उपमुख्याध्यापिका सौ सविता पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कुंडलिक जाधव,सौ रोहिणी भोपळे व प्रदीप गुरव सर यांनी केले.

error: Content is protected !!