पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संचाचे वाटप आज दिनांक 18-6-2024 रोजी कॉम्रेड जिल्हाध्यक्ष आनंदा गुरव व श्री दिनकर लोहार व हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरित करण्यात आले आज पर्यंत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने नोंदणी बांधकाम कामगारास शिष्यवृत्ती सेफ्टी किट व गृह उपयोगी वस्तू संच यांचे वाटप संघटनेच्या वतीने करण्यात आले यापुढेही शासनाच्या विविध योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन कॉम्रेड आनंदा गुरव यांनी दिले कार्यक्रमास डॉक्टर सुभाष पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश कौंदाडे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमास श्रीयश पाटील, सौ शितल पाटील, संतोष राऊत, पूजा आवडन, करीना म्होळे, सुप्रिया पसारे, माधुरी भिसे, अलका धोत्रे, जयश्री ठमके, गीतांजली ठमके, पल्लवी पाटील, सारिका चव्हाण, नंदिनी गावडे, कविता ढेंमरे व गिता चावरे आणि असंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.