कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरासह आसपासच्या परिसरामध्ये हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कुरुंदवाड मराठा सेवा संघ व मराठा मंडळाच्या वतीने कुरुंदवाड तेरवाड रस्त्यालगत मराठा मंडळाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व मराठा मंडळाचे अध्यक्ष महिपती बाबर यांनी स्वागत प्रास्ताविकात म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्याचा जन्म 1657 मध्ये किल्ले पुरंदर येथे झाला.
ते एक पराक्रमी योद्धा, लेखक आणि शासक होते त्यांनी मराठा साम्राज्याची सीमा वाढविण्यासाठी अनेक युध्दे लढली त्यांनी आपले वडील शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच स्वराज्याची आणि समाजाची काळजी घेतली.
यावेळी अभिषेक गणपती अडसूळ या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेमध्ये 90% मार्क मिळवल्याबद्दल त्याचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला .यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील,सचिव गोवर्धन माने,संचालक सचिन भोसले,सुरेश चोपडे,मेजर शिंदे,कृष्णा नरके, मोरेश्वर बाबर,डॉ सुभाष जाफळे,भीमराव यादव,गोपाळ चव्हाण,अजय भोसले,चंद्रकांत अडसूळ, बाळासाहेब बेले,शिंदे आदी उपस्थित होते.