पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स जीनियस ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले ही स्पर्धा सन इन्फोटेक सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये पुलाची शिरोली मधील सर्वच शाळांमधील तब्बल सहाशे विद्यार्थी परीक्षेस बसले होते ही स्पर्धा विविध गटामध्ये घेण्यात आली यामध्ये टिंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दुसरीच्या वर्गातील देवांशी पाटील या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला इयत्ता पाचवीच्या वर्गातून राधा मधेशिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला इयत्ता पाचवीच्या वर्गातून अर्पिता मौर्य या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला या सर्व विद्यार्थ्यांना मॅथ्स शिक्षक गणेश सकटे व दीक्षा लोहार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच स्कूलचे चेअरमन संतोष बाटे ,प्रिन्सिपल सौ. मनीषा बाटे , व्हाईस प्रिन्सिपल प्रतीक्षा पाटील, पुनम बागी, सारिका काळे , कविता ढेंबरे ,कविता कश्यप , मीनाक्षी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले