गणेश बावडेकर…
यांच्या ” पोरीनं इतिहास घडवला….
शिरोळ नगरीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाजी मंडई मध्ये असलेले एक साधे..
” श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स..”या व्यवसायाचे प्रोप्रायटर…
म्हणजेच श्री गणेश रामचंद्र बावडेकर एक अबोल शांत अतिशय स्वभावाने प्रेमळ आली गरीब असं व्यक्तिमत्व पोट भरण्याच्या उद्देशाने शिरोळ नगरीमध्ये कायमपणे स्थायिक झालेला हा परिवार आपल्या”गणेश इलेक्ट्रॉनिक”या टेप..टीव्ही..रेडिओ..इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करावयाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि आपल्या कलेतून शिरोळ आणि पंचक्रोशी मध्ये आपले नाव लौकिक केले आहे.अशा या सर्वसाधारण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबात “मयुरीचा” जन्म झाला.या मयुरीच्या जन्मताच संघर्ष हा तिच्या पाचवीला पुजलेला आहे.खरं म्हणजे मयुरी चा जन्म हा अमावस्येचा मयुरी आणि तिच्या बहिणीला जन्म देताच बाळंतपणातच तिची आई तिला सोडून गेली आणि आमचे मित्र श्रीयुत गणेश बावडेकर यांच्यासमोर फार मोठा दुःखाचा डोंगर तर कोसळलाच याचबरोबर या दोन मुलींचे पालन पोषण त्यांचे भविष्य या साऱ्या गोष्टींचा विचार करताच त्यांच्यापुढे अमावस्येच्या गडद काळ कुठ्ठ अंधारासारखे त्यांना भविष्य दिसू लागले.अल्पशा कालावधीनंतर या लहान मुलां मुलींची काळजी घेण्यासाठी.. त्यांचे पालन पोषण करण्यासाठी त्यांना लहानाची मोठे करण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी गणेशरावांनी दुसरे लग्न करण्याचा विचार करून या मुलांच्या आशीर्वादाने एक चांगली मायमाऊली” स्वातीनंदा” या… “आई “म्हणून… आणि एक चांगली “पत्नी” म्हणून त्यांना मिळाली. आणि या दोघांनी मिळून या मुलींना लहानाचे मोठे केले.त्यांना शिक्षण दिले.आणि हे करीत असताना कोणताही भेदभाव न करता.भविष्यात आपल्या पायावर कसे उभे राहायचे याबद्दल चांगलीच शिकवणूक दिली आणि याचेच फलित म्हणून.नुकत्याच झालेल्या “मुंबई पोलीस”या निवड स्पर्धेमध्ये उत्कृष्टपणे यश संपादन करून यांची लाडकी मुलगी कुमारी मयुरी गणेश बावडेकर हिची “मुंबई पोलीस” म्हणून यशस्वी निवड झाली.या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचे प्रयत्न आणि अपार त्याग आणि अपार कष्ट तर आहेतच.याचबरोबर मयुरीनेही आपल्या कुटुंबाची परिस्थितीची जाण आणि भान ठेवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अतिशय जिद्दीने अनेक वर्षे कठोर परिश्रम सातत्याने प्रयत्न करीत अखेर यशाचे शिखर गाठलेच
मयुरी यापूर्वी अनेक वेळा या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.परंतु काही थोडक्याच कमी गुनाने यश हुलकावणी देत होते.गेल्याच वर्षी अवघ्या १ गुणाने प्रतीक्षा यादीत यशासाठी वाट पाहत होती.परंतु नियतीने यश मिळाले नाही “अपयश ही यशाची पहिली पायरी असते…” याप्रमाणे या अपयशाने खचून न जाता परत तिने या परीक्षेसाठी तयारी केली आणि सद्यस्थितीला तिची या पोलीस खात्यात.एका टायमाला ३ पदावर तिची निवड झालेली आहे.ती म्हणजे मुंबई पोलीस मुंबई पोलीस चालक मुंबई कारागृह पोलीस अशा या पदावर तिने घवघवीत यश संपादन केलेले आहे.
मयुरीचा हा यशस्वी प्रवास पाहता.एखाद्या बापाला मुलापेक्षा मुलगीचा हा यशस्वी प्रवास खरोखर मनाला. आणि कुटुंबाला एक आनंददायी वातावरण होणार असणारा मुलीच्या भविष्याला एक आधार आणि किनार देणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका बापाला या मुलीच्या यशाने तिच्या आनंदाने बापाचा अभिमानाने भरून आलेला ऊर आणि मुलीच्या यशाने समाजामध्ये बापाची मान अभिमानाने वर आलेली पाहायला खरोखर बरे वाटते.अशा या “कुमारी मयुरी गणेश बावडेकर… “हिची घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून “मुंबई पोलीस”पदी निवड झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन..!
खरोखरच तिचे… कोड कौतुक…!
तिला अनेक शुभ आशीर्वाद…!
तिच्या भावी भविष्यातील वाटचालीस… मनःपूर्वक शुभेच्छा..!
तिला तिच्या कार्यक्षेत्रात असेच यश संपादन व्हावे..!
आणि तिने अशाच प्रकारे.. आपल्या आई-वडिलांचे नावलौकिक करावे.. !
आणि तिचा हा यशस्वी प्रवास पाहता खरोखर… असे म्हणावे वाटते की…
” श्री गणेश बावडेकर…
यांच्या ” पोरीनं इतिहास घडवला….”
कुमारी मयुरी गणेश बावडेकर हिचे पुनश्च एकदा….
मनःपूर्वक अभिनंदन..!💐
✍️ शब्दांकन सचिन पवार !!!