पंचगंगा नदीवरील पुलाची शिरोली पूर्वेकडील भागात नदीवरील मोटारीच्या केबल कॉन्टॅक्ट पट्ट्या तांब्याचे साहित्याचा चोरीच्या
प्रमाणात वाढले रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी चोरून नेऊन धुमाकूळ घातला आहे.
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील कृषी पाणी पुरवठा संस्थेच्या कृषी पंपांच्या मोटरच्या केबल, कॉन्ट्रॅक्ट पट्ट्या आदी तांब्याच्या साहित्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी हे साहित्य चोरट्याने चोरून नेऊन धुमाकूळ घातला आहे.यामुळे कृषी सह. संस्थांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यानां पाणी पुरवठा करण्यासही अडचणी येत असल्याने पीकांचेही नुकसान होत आहे.शेतकऱ्यानां पाणी पुरवठा करण्यासही अडचणी येत असल्याने पीकांचेही नुकसान होत आहे.पुलाची शिरोलीतील शिरोली विकास संस्थेच्या पेटीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन वेळा चोरी केली आहे. यामुळे संस्थेचे ५० हजाराचे वर नुकसान झाले आहे याबाबत संस्थेच्या वतीने चोरीची फिर्याद देण्यासाठी संस्थेचा कर्मचारी शिरोली पोलीस ठाण्यात गेला असता पोलीसानी टाळाटाळ केली. त्यानंतर चेअरमन सतीश पाटील यांनी प्रयत्न केल्यानंतर चोरीची फिर्याद घेतली पण तपास झाला नाही. त्यामुळे चोरट्याने दुसऱ्यांदा त्याच संस्थेच्या इलेक्ट्रिक साहित्याची दुसऱ्यादा चोरी केली. पंचगंगा नदीवरील या ठिकाणी वारंवार केबल चोरीची व कॉपर पट्ट्यांच्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी चोरटे बिनधास्तपणे चोरी करून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान व पाण्याविना पिकांचे नुकसान करत आहेत. तसेच प्रकारे पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेच्या केबलच्या तारा चोरून नेल्या आहेत पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेच्या केबलही चोरट्याने चोरून नेल्या आहेत. पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेनेही चोरीची फिर्याद शिरोली पोलीस एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली तरीही पुन्हा ५० फूट लांबीची केबल चोरट्याने तोडून चोरून नेली.संस्थांना चोरलेल्या इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी व परत पाण्याचे पाळीमध्ये बदल यामुळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. यामध्ये शेतकरी मात्र दुहेरी संकटात सापडला आहे वारंवार होणाऱ्या या केबल चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी आणि कृषी पाणी पुरवठा संस्था हतबल झाल्या आहेत. तसेच संताप ही व्यक्त होत आहे तरी पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित शोध घ्यावा, झालेल्या चोऱ्यांचा तपास करावा आणि पोलिसानी गस्त वाढवून चोरीच्या प्रकाराला आळा घालावा अशी पाणी शेतकऱ्याकडून होत आहे.