केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगरमध्ये हळदी कुंकू समारंभ व पाककला स्पर्धा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळ येथे महिला पालकांसाठी हळदी कुंकू समारंभ त्याचबरोबर शालेय स्तरावर तृणधान्याची पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके यांनी केले यावेळी शाळेच्या पालक सौ पोळ मॅडमनी हळदीकुंकू आणि सोबत देणाऱ्या वानाविषयी माहिती उपस्थित महिला पालकांना दिली.हळदीकुंकू कार्यक्रम झाल्यानंतर शालेय स्तरावरील पाककला स्पर्धा त्यपार पडल्या शेकडो पालकांनी वेगवेगळे तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ स्पर्धेसाठी घेऊन आले होते. या स्पर्धेचे मुख्यपरीक्षक म्हणून रिहाना कोठावळे , युवराज पाटील, महेश कांबळे यांनी पाककला स्पर्धेचे परीक्षण केले. आणि त्यातून चार नंबर काढण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक सौ.सीमा पोळ, द्वितीय क्रमांक सौ. अनिता हावले, तृतीय क्रमांक सौ. प्रियंका कोळी आणि चतुर्थ क्रमांक सौ.संध्या जाधव यांचा आला. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्रियंका कोळी, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके,महेश कांबळे, युवराज पाटील, प्रितम गवंडी, सौ, अनुराधा पुजारी,रीहाना कोठावळे, सौ विद्या पाटील,सौ अंजली घोळवे,सौ सारीका माने, यांच्यासह शेकडो महिला पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांकडून तालुकास्तरीय पाककला स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Spread the love
error: Content is protected !!