शिरोळ / प्रतिनिधी
जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.जायंट्स फेडरेशन अध्यक्ष प्रशांत माळी यांनी दुर्गा सहेलीच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा ढापरे यांना व कार्यकारिणी सदस्या आणि चार नूतन सदस्यांना शपथ दिल.शपथविधी व पदग्रहण सोहळा प्रोटोकॉलप्रमाणे अतिशय सुंदर झाला.या समारंभास जायंट्सचे केंद्रीय समिती सदस्य डॉ.अनिल माळी, फेडरेशन २ क चे अध्यक्ष प्रशांत माळी,फेड.माजी अध्यक्षा डॉ.सौ सुवर्णा माळी,फेडरेशन माजी अध्यक्ष डॉ. राजकुमार पोळ,फेडरेशन उपाध्यक्षा डॉ.सौ. स्नेहल कुलकर्णी, युनिट तीनच्या युनिट डायरेक्टर सौ. सुनिता शेरीकर,फेडरेशन ऑफिसर सौ संगीता जाधव तसेच एनसीएफ मेंबर सौ.ज्योती माळी,गोल्ड सिटीचे संस्थापक सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी उपस्थित होते.
मीटिंग कॉल टू ऑर्डर,दीप प्रज्वलन,जायंट्स प्रार्थना झाल्यावर स्वागत प्रास्ताविक डॉ.सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी केले.मावळत्या अध्यक्षा सौ अश्विनी नरूटे यांनी वर्षभराच्या कार्याचा आढावा घेऊन आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दुर्गा सहेलीच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा ढापरे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरात कोणते उपक्रम हाती घेणार आहे आणि कशा पद्धतीने काम करणार आहे.याविषयी सांगितले.सर्व मान्यवरांनी दुर्गा सहेलीच्या कार्याचे आणि त्यांच्या एकजुटीचे कौतुक करत दुर्गा सहेलीने असेच उत्साहात कार्य करावे असे सर्व मान्यवरांनी सांगितले.ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ.कुसुम जगदाळे,प्रा.श्रीदेवी नकाते यांनी मनोगते व्यक्त केली.आभार प्रा.सौ.श्रद्धा पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.सौ.शर्मिला देशपांडे आणि प्रा.सौ.श्रद्धा पाटील यांनी केले.वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.त्यानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.