हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले नगरपंचायतीसाठी लागणारा जिल्हा नियोजनचा निधी कमी पडू देणार नाही ‘ नवीन नगरपंचायतीसाठी १० कोटीची निधी तसेच 67 कोटी रुपयाची स्वच्छ पाणी पुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.ते हातकणंगले येथे पाच तिकीटी येथे सायकाळी ७ वाजता आयोजीत नगरपंचायतीचे नगरसेवक राजू इंगवले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बोलताना पुढे म्हणाले भाजपचे जेष्ठ सदस्य अरुणराव इंगवले हे आमचे मार्गदर्शक असून जिल्हाच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे ‘ तसेच नगरसेवक राजू इंगवले हे माझे चांगले मित्र असून ते सांगतील ते विकास निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे म्हणाले या कार्यक्रमास माजी आमदार सुरेश हाळवणकर . हिंदूराव शेळके, माजी जिप सदस्य अरुण इंगवले नगराध्यक्षा अर्चना जानवेकर ‘ आळते गावचे सरपंच अंजिक्य इंगवले ‘ भाजपाचे शहराध्यक्ष अमर इंगवले ‘ विजय खोत ‘ रमजान मुजावर ‘ अरुधंती सुर्यवंशी, मयूर कोळी , अभिजीत लुगडे ‘ दिपक कुन्नूरे ‘ दिनानाथ मोरे ‘ उमेश सुर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.