ओम पब्लिक स्कूलच्या वतीने लहान चिमूच्या आठवडी बाजाराचे आयोजन

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

 

कुंभोज तालुका हातकणंगले येथे ओम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ओम पब्लिक स्कूलच्या वतीने लहान चिमूच्या आठवडी बाजाराचे आयोजन आज करण्यात आले होते. सदर बाजारामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांच्या समवेत भाजीपाला खाद्यपदार्थ तसेच घरगुती उपयोगाच्या वस्तू शालेय उपयोगाच्या वस्तूंचा बाजार भरवला होता. सदर ठिकाणी बाजार खरेदी करण्यासाठी कुंभोज परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष विनायक माने सर्व मुख्याध्यापिका अश्विनी माने मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समिती तसेच शालेय सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!