वारणानगर (ता.पन्हाळा) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनातील बाल साहित्य संमेलनात श्री वारणा विद्यालयातील इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या कु.सर्वेश सर्जेराव पाटील (रा.कोडोली) याने एस.टी.महामंडळाची अनाऊसमेंट केली होती.
कु.सर्वेश सर्जेराव पाटील यांने केलेल्या अनाऊसमेंटचा विडिओ विविध टी.व्ही.चॅनेलसह इन्ट्राग्रामवर लाखो लोकांनी बघितला.जगभरातील लाखो लोकांच्याकडून त्यांच्या ह्या कलेचे कौतुक केले.आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वारणा विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी.मलमे (सर),जितेंद्र बिचकर (सर),खंडू शेखरे (सर),संजय शामराव पाटील,संदिप विलास लांडगावकर,सुरेश कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.