आ.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या हेरवाडात वह्या वाटप

Spread the love

हेरवाड / प्रतिनिधी 

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्यात आले. तर ग्रामपंचायत हेरवाड यांचेकडून शाळेला संविधानाची प्रत भेट देण्यात आली.सूत्रसंचालन दिलीप शिरढोणे यांनी केले.याप्रसंगी युनुस जमादार, सरपंच सौ.रेखा जाधव यांची मनोगते झाली. याप्रसंगी अब्दुललाट ग्रामपंचायतचे सदस्य सतिश कोळी,गटनेते दिलीप पाटील,माजी सरपंच सौ.चंद्रकला पाटील,शोभा पाटील,वैशाली पाटील,उपसरपंच प्रमोद माळगे,राष्ट्रीय काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सारंग पाटील,किसान कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शांतीनाथ चौगुले,सामाजिक कार्यकर्ते रतन चौगुले,ग्राम पंचायत सदस्य सचिन पाटील,दयानंद पाटील, भरत पोवार,हयातचाँद जमादार, अफसर मकानदार,विजयमाला पाटील,शितल कांबळे,अशोक पाटील, आणगोंडा पाटील,मुख्याध्यापक सुभाष तराळ यांचेसह अध्यापक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Comment

error: Content is protected !!