ई-जनगणनेचा शुभारंभ : ‘स्व-गणना’मुळे नागरिकांचा थेट सहभाग वाढणार उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव 

Spread the love

मीशिरोळ / प्रतिनिधी 

महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून ई-जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला असून ‘स्व-गणना’ या अभिनव प्रक्रियेद्वारे नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती थेट प्रणालीमध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक गतिमान,अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.ई-जनगणनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जन्म आणि मृत्यूची नोंद थेट जनगणना डेटाबेसमध्ये अद्ययावत होणार आहे.यामुळे शासकीय नोंदी अधिक अचूक राहतील तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होईल. याशिवाय, एखादी व्यक्ती १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतर तिचे नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट करण्याची सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.प्रथमच नागरिकांना Self-Enumeration Portal च्या माध्यमातून स्वतःची माहिती स्वतःच भरण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी मोबाईल ॲप, टॅब्लेट किंवा ऑनलाइन पोर्टलचा वापर करता येणार असून पारंपरिक कागदपत्रांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे.यामुळे वेळेची बचत होऊन माहिती संकलन अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.शिरोळ येथे या अभियानाचा शुभारंभ माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील आणि आमदार अशोकराव माने यांच्या निवासस्थानी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शिरोळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव तसेच नगरपालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना या ई-जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.डिजिटल माध्यमातून माहिती देताना अचूकता राखणे आणि वेळेत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.ई-जनगणना उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार असून भविष्यातील धोरण आखणीसाठी विश्वसनीय डेटा उपलब्ध होईल.डिजिटल भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून राज्यातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!