पुलाची शिरोली येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ५ ताब्यात

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 

पुलाची शिरोली ता हातकणंगले येथील माळवाडी परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ५ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख ४१०० रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले . हि कारवाई आज करण्यात आली .मिळालेल्या माहितीनुसार, माळवाडी-शिरोली येथील उमेश किसन सुर्यवंशी याच्या राहत्या घरी काही लोक एकत्र जमून बेकायदेशीर तीन पानी नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून १. उमेश किसन सुर्यवंशी (वय ५७) , २. पांडुरंग बापू रेडेकर (वय ५७) ,३. अशोक ज्ञानोबा इंगळे (वय ६७) ४. सदाशिव सुबण्णा गवळी (वय ६३) ५. विकास नागोराव पोळ (वय ४३) (सर्व राहणार माळवाडी, शिरोली ता. हातकणंगले ) याना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४,१००/- रुपये रोख आणि जुगारासाठी लागणारी पत्त्याची पाने असा एकूण ४,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक जालींदर अंकुश जाधव, संजय केशव पडवळ, रामचंद्र शामराव कोळी, महेश बाळासो आंबी, सुरेश शंकर पाटील, विनोद किशोर कांबळे आणि रुपेश रजनीकांत माने यानी केली असून या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!