पुलाची शिरोलीत तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची पोलिसांत नोंद

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी 

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) परिसरात एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सुभाष पाटील (वय ५५, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. रामनगर, शिरोली) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ही नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणातील मयताचे नाव सागर सुभाष पाटील (वय ३४, रा. रामनगर, शिरोली) असे असून तो करवीर तालुक्यातील मूळ रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित तरुण आपल्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तात्काळ शिरोली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (AD) नोंद क्र. ५०१/२०२६ अशी करण्यात आली असून, पुढील तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कुंभार,पोहे कॉ चिले करत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!