शिरोळ / प्रतिनिधी
इंजि.नितीन शेट्टी यांची Jain International Trade Organization (जितो) या जैन समाजाच्या अग्रगण्य सामाजिक व व्यावसायिक संस्थेकडून शिरोळ व परिसरासाठी टाऊन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.श्री.शेट्टी हे सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे, समर्पित व कार्यक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.त्यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक,शैक्षणिक आणि उद्योजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे शिरोळ परिसरातील जैन समाजाला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.विशेषतः जैन समाजातील युवक,नवउद्योजक तसेच गरजू घटकांसाठी मार्गदर्शन,संधी व सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.समाजातील प्रगतीसाठी एकजूट वाढवणे, व्यवसायिक नेटवर्क मजबूत करणे आणि सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवणे या क्षेत्रांत इंजि.श्री.शेट्टी यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे.नियुक्ती स्वीकारताना श्री.शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,“समाजातील गरजू जैन बांधवांसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांत प्रभावी काम करण्यावर माझा भर राहील.सर्व घटकांना सोबत घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”या वेळी रविंद्र देवमोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री.इंजि.शेट्टी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.इंजि.नितीन शेट्टी यांच्या निवडीमुळे शिरोळ परिसरातील जैन समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त होत आहे.