शिरोळ / प्रतिनिधी
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली मौजे आगर आणि जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व,तसेच आयुर्वेदिक उपचार आणि औषधांविषयी माहिती देणारा उपक्रम सिद्धिविनायक सोसायटी येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.या उपक्रमासाठी वाई (जिल्हा सातारा) येथील प्रख्यात आयुर्वेद तज्ञ डॉ.राजू शेख आणि त्यांच्या टीमला विशेष निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. शेख यांनी आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी काही सोप्या उपचारांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. त्यांच्या टीममधील अर्जुन सर, खोत मॅडम आणि अर्चना बलदवा यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी फेडरेशनच्या उपाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. फेडरेशनचे स्पेशल ऑफिसर सुधीर (भैय्या) कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना अशा उपक्रमांची समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी मोठी गरज असल्याचे सांगितले.मान्यवरांचा सत्कार दुर्गा सहेलीच्या उपाध्यक्ष अॅड. शर्मिला देशपांडे, गोल्ड सिटीचे अध्यक्ष अशोक गुंडे, कुसुम जगदाळे आणि नलिनी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा प्रा.स्मिता कोरे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.स्वाती बस्तवाडे, संगीता जाधव, अनुराधा वेल्हाळ, वीणा चव्हाण, श्वेता पुजारी, रेखा पाटील मॅडम, ललिता ऐनापुरे आणि प्रतिभा ढापरे यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी श्रद्धा पाटील, अनिता तांबड, रेखा पाटील, सुजाता कुल्लोळे, शंकर देसाई, महेंद्र पटेल,एकनाथ मगदूम,पांडुरंग बंडगर, घनश्याम मानधना,धनाप्पा कोष्टी, लावंड साहेब, महादेव शिंदे,रावसाहेब पवार यांसह जायंट्सचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम आरोग्याबाबत जनजागृती करणारा आणि मार्गदर्शक ठरला.