यड्राव को-ऑप बँकेचा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रु. ४१५ कोटींचा व्यवसायः चेअरमन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने आपला प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे.याबाबत अधिक माहिती देताना बँकेचे अध्यक्ष अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की बँकेने २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात रु. ४१५ कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला असून रु. ४.८८ कोटी रुपये इतका ढोबळ नफा झाला आहे. बँकेने सभासदांचा विश्वास सार्थ करत ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्याने एकूण व्यवसायामध्ये लक्षणीय वृद्धी केली आहे.बँकेचे अनुभवी संचालक मंडळ व तज्ञ व्यवस्थापकीय मंडळ यांचे सक्षम व्यवस्थापन तसेच कार्यकुशल कर्मचारीवृंद यांनी या आर्थिक वर्षामध्ये बँकेने सर्व स्तरावर नियोजनबद्ध काम करून सभासद व ठेवीदारांचा विश्वास वृद्धिंगत केला आहे असेही अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले. गेल्या ५ वर्षामध्ये बँकेने एकूण व्यवसाय व नफ्यामध्ये सातत्याने प्रगति करत असताना ठेवींच्या विविध योजनेद्वारे आकर्षक व्याजदर देत ठेवीदारांचे आर्थिक हित जपले आहे. ठेवीदारांच्या रु. ५ लाखांपर्यंतच्या मुदत ठेवींना विमा संरक्षण दिले आहे. बँकेने या आर्थिक वर्षामध्ये रु. १६४ कोटींचे कर्ज वाटप केले असून कर्ज वसुलीची स्थिती भक्कम आहे असे ते म्हणाले.बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ०.००% इतके असून बँकेने रिजर्व बैंक व इतर बैंकिंग नियामक संस्थांनी घालून दिलेले वैधानिक आर्थिक मापदंडांचे कसोशीने पालन केले आहे. शेती सुधारणा कर्ज, गृह कर्ज, वाहन तारण कर्ज, व्यवसाय वृद्धी, प्रकल्प कर्ज, शेती व शेती पूरक उद्योग वाढीसाठी कर्ज तसेच केंद्र सरकारच्या पीएमईजीपी व राज्य शासनाच्या सीएमईजीपी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या माध्यमातून लहान उद्योजक, शेतकरी तसेच सर्व सामाजिक स्तरातील ग्राहकांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. यड्राव बैंक कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील ग्राहकांना ६ शाखांद्वारे तसेच ATM, मोबाईल बैंकिंग, UPI पेमेंट, IMPS तसेच व्हॉटसअप बँकिंग द्वारे आर्थिक सेवा पुरवीत आहे.या उल्लेखनीय कामगिरीसाठी बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ, बँकेच्या विविध कार्यकारी समित्या व सर्व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे अध्यक्ष अजय पाटील यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.या प्रसंगी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, बँकेचे उपाध्यक्ष दिलीप मगदूम, लेखा परीक्षक सीए व्ही.के.बस्तवडे, सचिन देशिंगे (तज्ञ संचालक), संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!