पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत शिरोली यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिरदेव मंदिर हॉल व बुदले हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला गावातील महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा तसेच ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपली कला, कौशल्य आणि सर्जनशीलता सादर केली. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी परिसर सजला, तर मेहंदी स्पर्धेत सुंदर नक्षीकाम पाहायला मिळाले. पाककला स्पर्धेत विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल होती.कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे व पंचायत समिती सदस्या कमल कौंदाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सौ. गीता कोळी, तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.रांगोळी स्पर्धेत सौ.ऋतूजा विकास पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला,द्वितीय क्रमांक सौ.स्वाती प्रदीप मोंगले व तृतीय क्रमांक स्वाती किरण कौंदाडे यांनी पटकावला , कावेरी अतुल गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
पाककला स्पर्धेत
सौ. प्रतिक्षा संदीप शियेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर सौ. माधवी रविंद्र पाटील यांनी द्वितीय व सौ. शिला महावीर परमाज यांनी तृतीय क्रमांक पटकावला, उत्तेजनार्थ सौ. वर्षा सागर कौंदाडे यांनी पटकावला
मेहंदी स्पर्धेत
सौ. सिमा जयदीप जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला, सौ. अल्फीजा अरफाज रिकीबदार यांनी द्वितीय, तर तृतीय सौ.समिना तौसिफ सनदे यांनी तर नयना जमीर देसाई उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांचा सन्मान बक्षीस व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
वेशभूषा स्पर्धेत
सौ. अश्विनी सूर्यवंशी,सौ. शितल जाधव, सौ.शितल पाटील आणि सौ.सिद्धी मोंगले या स्पर्धकांनी आकर्षक वेशभूषेत सहभाग घेत प्रेक्षकांची दाद मिळवली.
‘होम मिनिस्टर’ स्पर्धा हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. या स्पर्धेत सौ. प्रणाली राकेश जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावत वॉशिंग मशीन हे आकर्षक बक्षीस मिळवले. द्वितीय क्रमांक कांचन कोकरे सोफा सेट तर तृतीय क्रमांक दिपाली धनाजी पाटील यांना आटा चक्की तर उत्तेजनार्थ रुक्साना देसाई यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. स्पर्धा रात्री उशिरापर्यंत रंगतदार वातावरणात पार पडली.या कार्यक्रमाला सौ.पुष्पा पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिला तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा उत्साह आणि सहभाग पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले.महिला सक्षमीकरणाचा संदेश देत आणि महिलांच्या कलागुणांना वाव देत हा महिला दिन सोहळा संस्मरणीय ठरला. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.