शिरोली परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले,संरक्षण भिंत व झाड कोसळून २५ लाखाचे नुकसान

Spread the love

वादळी वाऱ्यास पावसामुळे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील येथील मेनन पिस्टन लिमिटेड या कंपनीत संरक्षण भिंत व झाड पार्किंग शेडवर कोसळून २५ लाखाचे नुकसान झाले

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 
शिरोली परिसराला आज शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शिरोली औद्योगिक वसाहतीमधील येथील मेनन पिस्टन लिमिटेड या कंपनीत संरक्षण भिंत व झाड पार्किंग शेडवर कोसळून २५ लाखाचे नुकसान झाले आज शनिवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वारे वाहू लागले.वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या वादळाचा तडाखा मेनन पिस्टन कंपनीत कामगार व कंपनी स्टाफच्या दुचाकी गाड्यांवर संरक्षण भिंतीस मोठे झाड शेडवर कोसळ्याने यामुळे शेडखाली उभ्या असलेल्या अनेक कामगारांच्या दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही गाड्यांचा चक्काचूर झाला असून कामगारांना मोठ्या आर्थिक फटका बसला आहे.घटना घडली तेव्हा पार्किंग परिसरात वर्दळ कमी होती, तसेच झाड पडल्याची चाहूल लागताच अनेकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कंपनीचे पायाभूत नुकसान आणि कामगारांच्या वाहनांचे नुकसान पाहता, या आपत्तीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!