अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; युसुफ पेट्रोलियमची ग्राहकांसाठी स्तुत्य सुविधा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल दरवाढ किंवा पुरवठा खंडित होण्याच्या अफवांनी शिरोळ शहरात एकच खळबळ उडवली.या अफवांमुळे आज शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहनधारक आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वादही झाल्याची माहिती समोर आली आहे.नेहमीप्रमाणे 100 ते 200 रुपयांचे पेट्रोल भरणारे अनेक वाहनधारक आज 500 ते 600 रुपयांचे पेट्रोल भरताना दिसून आले. यावरून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती स्पष्ट होत आहे. मात्र पंप चालकांनी कोणतीही टंचाई नसून पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा,असे आवाहनही करण्यात आले.दरम्यान, शिरोळ-जयसिंगपूर महामार्गावरील युसुफ पेट्रोलियमने या गर्दीतही ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष पुढाकार घेतला.सध्या उन्हाचा तडाखा वाढला असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय म्हणून खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच गार पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.पेट्रोल कॅन किंवा बाटल्यांमध्ये देण्यास मनाई करण्यात आल्याने काही नागरिकांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे पंप प्रशासनाने सांगितले.युसुफ पेट्रोलियमच्या या संवेदनशील आणि ग्राहकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक नागरिकांनी व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले आहेत. अफवांच्या वातावरणातही जबाबदारीने सेवा देत ग्राहकांची काळजी घेण्याचा हा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!