शिरोली पुलाची येथील पिर दर्गा परिसरात वयोवृद्धाची आजारपणास कंटाळून आत्महत्या 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची येथील पिर दर्गा परिसरात वयोवृद्धाची आजारपणास कंटाळून आत्महत्या शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील विट्ट भट्टी परिसरात असणाऱ्या पिर दर्ग्याच्या मागील बाजूस पट्टणकोडोली येथील ६५ वर्षीय वयोवृद्धाने आजारपणास कंटाळून गळफास लावून घेवून आत्महत्या केली.ही घटणा आज रविवारी सकाळी उघडकीस आली .मयत वयोवृद्धाचे नाव रामचंद्र राघू गावडे ( वय ६५ रा पट्टणकोडोली ता हातकणंगले ) असे असून ते अनेक दिवसापासून आजारी होते औषध उपचार करून देखील आपला आजार बरा होत नसल्याने ते पुर्णपणे नैराश्यात गेले होते . त्यानी १८ मार्च रोजी घरातील कोणास न सांगता निघून गेले घरच्या लोकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नसल्याने घरच्यांनी हुपरी पोलिस ठाण्यात १९ मार्च रोजी मिसिंग कंप्लेंट नोंद केली होती पण आज सकाळी ते शिरोली येथील विट्ट भट्टी परिसरातील पीर दर्ग्या मागील बाजूस असणाऱ्या राजबा चौगुले यांच्या शेतीवडीतील वडाच्या झाडाला गळफास लावून घेतलेला मृतदेह आढळून आला .या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!