पुलाची शिरोली एमआयडीसीत भट्टीचा भीषण स्फोट; कामगाराचा जागीच मृत्यू  

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी रात्री एका कंपनीत हिट ट्रीटमेंट भट्टीचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत इंग्रुळ (ता. शिराळा) येथील एका ३८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. राहुल मुकुंद कांबळे (वय ३८, रा. इंग्रुळ, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत कामगाराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कांबळे हा गेल्या सहा वर्षांपासून शिरोली एमआयडीसीमधील ‘श्रीराम इंडस्ट्रीज’ या कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास राहुल अन्य तीन सहकाऱ्यांसह कंपनीत काम करत होता. याच दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला. वीज गेल्याच्या काही मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कांबळे हा गेल्या सहा वर्षांपासून शिरोली एमआयडीसीमधील ‘श्रीराम इंडस्ट्रीज’ या कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास राहुल अन्य तीन सहकाऱ्यांसह कंपनीत काम करत होता. याच दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला. वीज गेल्याच्या काही वेळातच हिट ट्रीटमेंटच्या भट्टीचा मोठा आवाज होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या तडाख्यात राहुल सापडल्याने त्याचा जागीच अंत झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या कंपन्यांमधील कामगारही भीतीपोटी बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच कंपनी मालकांनी तातडीने धाव घेतली आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात (सीपीआर) पाठविला आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. राहुलच्या अकाली निधनाने त्याच्या मूळ गावी इंग्रुळ येथे शोककळा पसरली आहे.याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भट्टीच्या स्फोटामुळे गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे याबाबत संबंधित शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेच्या उपायोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काम करत असताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर आणि यानंतर सामग्रीची नियमित तपासणी याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी कामगारातून करण्यात येत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!