पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्यातर्फे कन्या वि.मं.शिरोली नं 1 शाळेस सुमारे 60 हजार रु किमतीचे १५ बेंच प्रदान करण्यात आले. हे बेंच स्मॅकचे अध्यक्ष तसेच उद्योजक रो. राजाराम पाटील, उद्योजक रो. नरेश पांचाळ आणि सी.ए. श्री. राकेश मुथा यांच्या देणगीतून उपलब्ध झाले.रो. राजाराम पाटील, रो. नरेश पांचाळ व ग्रामपंचायत शिरोलीच्या सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे यांच्या हस्ते हे बेंच शाळेस प्रदान करण्यात आले. राजमाता जिजाऊ लेझीम पथकाने सर्व पाहुण्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. मुख्य कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी उपसरपंच श्री. बाजीराव पाटील यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे अध्यक्ष रो. सी.ए. सुमित बिरंजे यांनी रोटरीच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.याच कार्यक्रमात इ 7 वी प्रज्ञाशोध अंतिम परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीनी कु आरजू अन्सारी व मार्गदर्शक शिक्षक श्री.संजय जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आज क्लबचे सेक्रेटरी रो. अभिनंदन वणकुद्रे यांचा वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांनी सुंदर गाणे सादर करत त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या आनंदाच्या क्षणी रो. अभिनंदन यांनी शाळेसाठी दोन पंखे देण्याची घोषणा केली.या कार्यक्रमास सरपंच सौ.पद्मजा करपे ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी उपसरपंच श्री. बाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ. सुजाता बाळासो पाटील, मुख्याध्यापिका सौ. अंजना संकपाळ, प्रेसिडेंट इलेक्ट रो. सागर बकरे, रो. ॲड. संदीप पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.राजाराम करपे , सौ.सुजाता चव्हाण , ज्योती कोळी, सौ. मीना कुमावर तसेच शिक्षक श्री.फिरोज मुल्ला ,सौ.रेखा चौगले , सौ. पूर्वा दळवी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा मिळाली असून शिक्षणासाठी अधिक चांगले वातावरण निर्माण होणार आहे. अशा सामाजिक उपक्रमांमधून रोटरी क्लब समाजाशी आपले नाते अधिक दृढ करत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय जाधव सर यांनी केले तर आभार श्री.फिरोज मुल्ला यांनी मानले.