शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगली विकासावर सकारात्मक चर्चा

Spread the love

हुपरी / प्रतिनिधी 

हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगली महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट होऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.हा सोहळा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न राहता सांगली शहराच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा संवादाचा मंच ठरला.या प्रसंगी सांगली महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत महापौर सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. शहराच्या पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि आगामी विकास प्रकल्पांबाबत सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे समजते. राज्य सरकारच्या सहकार्याने सांगलीच्या विकासाला गती मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.या शाही सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, जयसिंगपूर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच उद्योजक संजय घोडावत यांच्यासह अनेक राजकीय,सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेली ही भेट सांगली महानगरपालिकेच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.राज्य सरकारचे मार्गदर्शन आणि स्थानिक नेतृत्वाचे प्रयत्न यांच्या बळावर सांगली शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.या संवादातून भविष्यातील विकासाची भक्कम पायाभरणी होऊन सांगली शहर लवकरच प्रगतीचा नवा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!